0
झाली होती अशी भविष्यवाणी

  • रिलिजन डेस्क. लोकांनी आजपर्यंत शिव धनुष्य मोडण्याच्या अनेक कथा ऐकल्या असतील. श्रीरामाने सितेच्या स्वयंवरावेळी हे धनुष्य मोडले होते. या प्रसंगाविषयी खुप लोकांना माहिती आहे. पण श्रीकृष्णानेही शिव धनुष्य मोडले होते हे खुप कमी लोकांना माहिती आहे. श्रीकृष्णाने शिव धनुष्य मोडण्याचा प्रसंगही खुप रंजक आहे. श्री कृष्णाने धनुष्य का मोडले होते? याविषयी सविस्तर...


    - विष्णु देवाने आपला आठवा अवतार श्रीकृष्णाच्या रुपात घेतला तेव्हा काही परिस्थितीमुळे श्रीकृष्णाच्या हातून शिव धनुष्य मोडले होते. ज्यावेळी कंसाने श्रीकृष्णाला नंदगाव, मथुरा येथे बोलावून त्याच्या हत्येची योजना आखली होती.

    - कंसाने बोलावल्यानंतर श्रीकृष्ण अक्रुरजीसोबत धनुष्य यज्ञात सहभागी होण्यासाठी आले होते. ज्या ठिकाणी यज्ञाचे आयोजन करण्यात आले होते, तेथे श्रीकृष्ण पोहोचले. याच मंदिरात कंसाने शिव धनुष्य ठेवले होते आणि याच धनुष्यासाठी यज्ञही केला होते.

    - श्रीकृष्णाने धनुष्याला स्पर्श करण्याची इच्छा व्यक्त केली. कृष्णाची इच्छा एकून सर्व हसू लागले. त्यांना वाटले की, एक बालक हा धनुष्य कसा उचलू शकतो, पण श्रीकृष्णाने खेळता-खेळता हे धनुष्य उचलले आणि उचलून मोडून टाकले.

    - धनुष्य मोडल्याचे वृत्त कळताच कंस घाबरला. कारण जो धनुष्य उचलेल तो कंसाचा वध करेल अशी भविष्यवाणी करण्यात आली होती. मथुरेच्या जनतेत आनंद पसरला, कारण कंसाला मारणारा कुणी तरी आला होता. या घटनेच्या दुस-याच दिवशी श्रीकृष्णाने कंसाचा वध केला आणि मथुरेला त्याच्या अत्याचारापासून वाचवले.kans vadh story in mathura

Post a Comment

 
Top