0
पाच नंबर फलाटावर असलेल्या रेल्वे रुळाला तडा गेल्याची बाब गँगमन अमोल पगारे यांच्या लक्षात आली.

नाशिक- मनमाड जंक्शन रेल्वे स्थानकात सोमवारी सकाळी कडाक्याच्या थंडीमुळे रेल्वे रुळाला तडा गेला. ही बाब गँगमनच्या वेळीच लक्षात आल्याने काकीनाडा-शिर्डी एक्स्प्रेस या गाडीला होणारा संभाव्य अपघात टळला. या घटनेमुळे रेल्वे स्थानकात खळबळ उडाली होती. तडा गेलेल्या रेल्वे रुळाची जोडणी झाल्यावर वाहतूक सुरळीत करण्यात आली. ही घटना सोमवारी सकाळी सव्वा सातच्या सुमारास फलाट क्र. 5 वर घडली.

काकीनाडा एक्स्प्रेस स्थानकात येत होते. मात्र, रुळाला तडा गेल्याचे लक्षात आल्यानंतर ही गाडीला बाहेर थांबविण्यात आली. पाच नंबर फलाटावर असलेल्या रेल्वे रुळाला तडा गेल्याची बाब गँगमन अमोल पगारे यांच्या लक्षात आली. त्यांनी या घटनेचे माहिती तातडीने रेल्वे अधिकाऱ्यांना दिली. अधिकाऱ्यांनी तातडीने घटनास्थळी धाव घेतली. त्यानंतर तडा गेलेल्या रुळाला नवीन फिश प्लेट लावून तातडीने दुरुस्ती करण्यात आली. मार्ग सुरळीत झाल्यानंतर काकीनाडा एक्स्प्रेस अखेर रेल्वे स्थानकात फलाट पाच वर घेण्यात आली. गेल्या काही दिवसांपासून थंडीच्या कडाक्याने येथील पारा 5 अंशाच्या खाली गेला आहे. तपमान घसरल्यानेच रुळाला तडा गेल्याचे अधिकाऱ्यांनी सांगितले. दरम्यान, या फलाटावर येणाऱ्या सर्व गाड्या दुसऱ्या फलाटावरून मार्गस्थ करण्यात आल्याने प्रवाशांची धावपळ उडाली.

यामुळे जातात तडे
सर्वसाधारणपणे दोन रेल्वे रुळांमध्ये तपमान कमीजास्त होत असल्याचा विचार करून 1 एमएम ते 1.5 एमएमपर्यंत गॅप ठेवलेला असतो. 10 अंश ते 30 अंशादरम्यान तपमान कमी जास्त झाले तरी या जॉइन्टवर फारसा परिणाम होत नाही. मात्र, तपमान 5 अंशाखाली घसरल्यास आधी जर दोष राहिलेला असेल तेथील रेल्वे रुळांमधील जोडणीच्या ठिकाणचा गॅप वाढतो. कमी तपमानाने लोखंडी रूळ आकुंचन होऊन फट मोठी होती. मनमाडला पहाटे 5 अंशाखाली तपमान घसरल्याने संबंधित गँगमनच्या तेथे फट पडल्याचे तातडीने लक्षात आल्याने संबंधित दुर्घटना टळली. उन्हाळ्यात नेमके उलटे चित्र पाहावयास मिळते. तपमान 42 अशांवर गेल्यानंतर रूळ प्रसरण पावल्याने लांबी वाढून ओेव्हरलॅप होऊन रुळाला तडा जातो. असा प्रकारही गेल्या मे महिन्यात मनमाड येथे घडला होता. तेव्हाही गँगमनच्या ही बाब लक्षात आल्याने मोठा अनर्थ टळला होता.
Railway Track Crack Near Manmad Station aware to accident situation

Post a Comment

 
Top