0
नवव्या दिवशी बेस्ट कर्मचाऱ्यांचा संप मागे
मुंबई: बेस्ट कर्मचाऱ्यांनी अखेर नवव्या दिवशी संप मागे घेतला. थोड्याच वेळात कर्मचारी युनियनकडून याबद्दलची अधिकृत घोषणा होणार आहे. वेतनवाढीसह विविध मागण्यांसाठी 7 जानेवारीपासूनच्या मध्यरात्रीपासून बेस्ट कर्मचारी संपावर होते. त्यानंतर राज्य सरकारनं या प्रकरणी उच्चस्तरीय समितीची नेमणूक केली. अखेर आज मुंबई उच्च न्यायालयानं युनियनला संप मागे घेण्याची सूचना केली. ही सूचना युनियननं मागे घेतली. 

गेल्या काही दिवसांपासून उच्चस्तरीय समितीच्या बैठका सुरू होत्या. मात्र कर्मचाऱ्यांच्या मागण्या सरसकट मान्य केल्या जाऊ शकत नाही, त्यामुळे निर्माण होणारा बोजा आम्ही सहन करू शकत नाही, अशी स्पष्ट भूमिका बेस्ट प्रशासनानं घेतली. तर सर्व मागण्या पूर्ण करा, अन्यथा बंद मागे घेणार नाही, या भूमिकेवर कर्मचारी युनियन ठाम होती. त्यामुळे आठवडा उलटूनही मुंबईच्या रस्त्यावर एकही बस धावली नव्हती. अखेर आज उच्च न्यायालयाच्या आदेशानंतर ही कोंडी फुटली.

कर्मचाऱ्यांना काय मिळालं?
बेस्ट कर्मचाऱ्यांना जानेवारीपासून मिळणारी 10 टप्प्यांची वेतनवाढ तातडीनं लागू होणार
बेस्ट आणि पालिकेचा अर्थसंकल्पाचं विलनीकरणाच्या निर्णयासाठी मध्यस्थाची नेमणूक झाली
पगारवाढ, विलनीकरणाबद्दलच्या अंतिम तडजोडीसाठी तीन महिन्यांची मुदत; मध्यस्थ निर्णय घेणार
संपकरी कर्मचाऱ्यांवर कोणतीही कारवाई होणार नाही
एकाही कर्मचाऱ्याचं वेतन कापलं जाणार नाही
कोणत्याही कर्मचाऱ्याला सेवेतून कमी करणार नाही
best strike ends on ninth day what will best employees get | Best Strike: संप संपला! जाणून घ्या बेस्ट कर्मचाऱ्यांना काय मिळालं

Post a Comment

 
Top