0
मेलबर्न : 

ऑस्ट्रेलियाने दिलेल्या २३१ धावांच्या आव्हानाचा पाठलाग करताना भारताचीही संथ सुरुवात झाली. भारताने पहिल्या ४ षटकात ४ धावा केल्या होत्या. त्यानंतर पिटर सिडलने रोहित शर्माला ९ धावांवर बाद करत पहिला धक्का दिला.

दोन सामने बेंचवर बसलेल्या यजुवेंद्र चहलने या दोन सामन्याचा वजावटा तिसऱ्या आणि निर्णायक सामन्यात काढला. त्याने १० षटकात ४२ धावा देत ६ कांगारुंना गारद केले. त्याची ही वनडेतील सर्वात चांगली बॉलिंग फिगर आहे. चहलच्या या जादुई फिरकीपुढे कांगारू पार ढेपाळले. कांगारुंचा सगळा संघ २३० धावातच पॅव्हेलियनमध्ये पोहलचा आहे. हँडस्कब आणि शॉन मार्शने या भेदक भारतीय माऱ्याचा मुकाबला करण्याचा प्रयत्न केला. पण, हँडस्कबची ५८ धावांची अर्धशतकी, तर मार्शची ३९ धावांची खेळी ऑस्ट्रेलियाला मोठी धावसंख्या उभरण्यास कामी आली नाही. त्यामुळे भारताने मालिका विजयासाठी महत्वाच्या असलेल्या सामन्यावर आपली पकड मजबूत केली आहे.

तिसऱ्या आणि निर्णायक वनडे सामन्यात भारताने ढगाळ वातावरण पाहून प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. हा निर्णय योग्य ठरवत भुवनेश्वरने सुरुवातीलाच ऑस्ट्रेलियाच्या फलंदाजीला खिंडार पाडले. त्याने आस्ट्रेलियाच्या दोन्ही सलामीवीरांचा अडथला दूर केला. नवीन चेंडूवर भुवनेश्वर आणि शामी गोलंदाजी करत असताना फक्त ओहह... असे आवाज येत होते. कांगारू या दोघाच्या गोलंदाजीवर बॉलला बॅट लावण्यासाठी चांगलाच संघर्ष करत होते. दोन्ही सलामीवीर माघारी परतले होते त्यावेळी ऑस्ट्रेलियाच्या जवळपास ९ षटके खेळून फक्त २७ धावा झाल्या होत्या.

ॲरोन फिंच आणि ॲलेक्स केरी बाद झाल्यावर शॉन मार्श आणि उस्मान ख्वाजा या डावखूऱ्या जोडीने ऑस्ट्रेलियाचा डाव सावरला. या दोघांनी मंद झालेली ऑस्ट्रेलियाची धावगती वाढवण्यास सुरुवात केली. दोघांनीही ऑस्ट्रेलियाला शतक पार करुन दिले. पण, ही जमेलेली जोडी लेगस्पिनर चहलने फोडली त्याने ३९ धावा करणाऱ्या शॉन मार्शला बाद केले. त्या पाठोपाठ चहलने उस्मान ख्वाजालाही बाद करत ऑस्ट्रेलियाला मोठा धक्का दिला.

पहिल्या दोन वनडेत बेंचवर बसलेल्या चहलने तिसऱ्या आणि निर्णायक वनडेत जबरदस्त गोलंदाजीचे प्रदर्शन केले. ख्वाजानंतर काही वेळातच स्टॉयनिसला बाद करत त्याने आपला तिसरा बळी टिपला. याचबरोबर ऑस्ट्रेलियाची अवस्था २ बाद १०० वरुन पाच बाद १२३ झाली. त्यानंतर पिटर हँडस्कब आणि ग्लेन मॅक्सवेल यांनी ऑस्ट्रेलियाची धावगती वाढवण्यास सुरुवात केली. धडाकेबाज फलंदाज मॅक्सवेलने चार चौकार मारत आपले इरादे स्पष्ट केले. पण, शामीने त्याला बाऊंसर टाकत त्याची भांबोरी उडवली. अशाच एका बाऊंसरवर पूल मारण्याच्या नादात मॅक्सवेल भुवनेश्वरकडे झेल देत बाद झाला. मॅक्सवेल बाद झाल्यावर हँडस्कबने डावाची सुत्रे आपल्या हातात घेतली. त्याने अर्धशतक झळाकावत ऑस्ट्रेलियाला २०० च्या पार पोहचवले. पण, तोही अर्धशतकानंतर ५८ धावा करुन अखेरची काही षटके बाकी असताना बाद झाला. चहलने हँडस्कबला बाद करत कांगारुंचा निम्मा संघ गारद केला. तो इथेच थांबला नाही तर त्याने आपल्या अखेरच्या षटकात झॅम्पाला बाद करत सहावा कांगारूही टिपला.

चहल, भुवनेश्वर आणि शामीच्या भेदक माऱ्यासमोर ऑस्ट्रेलिया २३० धावात गारद झाला. त्यामुळे भारताची सामन्यावरील तसेच मालिकेवरील पकड मजबूत झाली आहे.

Live Update

*भारताच्या १४ षटकात १ बाद ५१ धावा

*भारताच्या ९ षटकात १ बाद २५ धावा

*भारताला पहिला धक्का; सिडलने रोहितला ९ धावांवर केले बाद

*भारताच्या ४ षटकात बिनबाद ४ धावा

*भारताची संथ सुरुवात

*ऑस्ट्रेलिया २३० धावात गारद; भारतासमोर २३१ धावांचे लक्ष्य

*ऑस्ट्रेलियाच्या ४७ षटकात ८ बाद २२६ धावा 

*ऑस्ट्रेलियाला ७ वा धक्का; रिचर्डसन १६ धावांवर माघारी

*हँडस्कबचे अर्धशतक; कांगारु २०० पार

*ऑसट्रेलियाच्या ४१ षटकात ६ बाद १९३ धावा

*ऑस्ट्रेलियाच्या ३५ षटकात ६ बाद १६१ धावा

*ऑस्ट्रेलियाला सहावा धक्का; धोकादायक मॅक्सवेल २६ धावा करुन माघारी

*ऑस्ट्रेलियाच्या ३० षटकात ५ बाद १२४  धावा

*ऑस्ट्रेलियाचा निम्मा संघ गारद; स्टॉयनिस ठरला चहलचा तिसरा बळी 

*ऑस्ट्रेलियाच्या २४ षटकांत ४ बाद १०१ धावा

*ऑस्ट्रेलियाला चौथा धक्का, ख्वाजा ३४ धावांवर बाद

*शॉन मार्श ३९ धावांवर बाद, ऑस्ट्रेलियाच्या २३.१ षटकांत ३ बाद १०० धावा

*ऑस्ट्रेलियाच्या २० षटकात २ बाद ८० धावा

*ऑस्ट्रेलियाची खराब सुरुवात; १० षटकात २ बाद ३० धावा

*कर्णधार फिंचचा खराब फॉर्म सुरुच; १४ धावांवर भुवनेश्वरने माघारी धाडले

*ऑस्ट्रेलियाच्या ४ षटकात १ बाद ९ धावा

*ऑस्ट्रेलियाला पहिला धक्का; ॲलेक्स केरी ५ धावा करुन बाद

*सामन्यास सुरुवात

*खराब हवामानामुळे सामना उशिरा सुरु होणार

*नाणेफेक जिंकून भारताचा गोलंदाजी करण्याचा निर्णय 

*जहल, केदार जाधव आणि विजय शंकर यांना संधी

*भारतीय संघात तीन बदलPost a Comment

 
Top