0
काही दिवसांपूर्वीच कादर खान यांना प्रकृती अस्वास्थामुळे रुग्णालयात दाखल करण्यात आले होते.

नवी दिल्ली - बॉलिवूडचे दिग्गज अभिनेते कादर खान यांचे निधन झाल्याची माहिती समोर आली आहे. वृत्तसंस्था पीटीआयने यासंदर्भात वृत्त दिले आहे. कादर खान गेल्या काही वर्षांपासून आजारी होते. उपचारासाठी ते कॅनडामध्ये मुलाबरोबर राहत होते. काही दिवसांपूर्वीच कादर खान यांना प्रकृती अस्वास्थामुळे रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. त्यात आज पहाटे नव्या वर्षाची सुरुवात या वाईट बातमीने झाली आहे.

कादर खान यांचा मुलगा सरफराज यांनी दिलेल्या माहितीनुसार 31 डिसेंबर रोजी सायंकाळी 6 वाजेदरम्यान कादर खान यांचे निधन झाले. त्यांच्या पार्थिवावर कॅनडात अंत्य संस्कार करायचे की, भारतात आणून अंत्यसंस्कार करायचे याबाबत कुटुंबीय निर्णय घेणार असल्याची माहिती मिळाली आहे.

प्रोग्रेसिव सुप्रान्यूक्लीयर पाल्सी डिसऑर्डरने पीडित होते..

कादर खान यांना BiPAP व्हेंटिलेटरवर ठेवण्यात आले होते. प्रोग्रेसिव्ह सुप्रान्यूक्लीयर पाल्सी डिसऑर्डरमुळे त्यांच्या मेंदुने काम करणे बंद केले होते.

दीर्घ काळापासून कॅनडात होते

कादर खान गेल्या अनेक वर्षांपासून कॅनडा येथे त्यांच्या मुलासोबत वास्तव्याला होते. येथे त्यांचा मुलगा सरफराज आणि सून शाइस्ता वास्तव्याला आहेत. सरफराजने दिलेल्या माहितीनुसार, डॉक्टरांची एक टीम त्यांच्या प्रकृतीकडे लक्ष ठेऊन होती. त्यांना श्वास घ्यायला त्रास होत असल्याने बाइपेप व्हेंटिलेटरवर ठेवण्यात आले होते.

काय असते पीएपी
प्रोग्रेसिव सुप्रान्यूक्लीयर पाल्सी (पीएसपी) एक असामान्य मेंदुचा आजार असून तो शरीराची हालचाल, बोलणे आणि दृष्टीला प्रभावित करतो. हा आजार मेंदुतील सर्व नर्व सेल्स नष्ट करण्याचे कारण ठरतो.

गेल्या वर्षी झाली होती शस्त्रक्रिया
कादर खान यांचा मुलगा सरफराजने सांगितल्यानुसार, कादर साहेबांवर 2017 मध्ये गुडघ्यावर शस्त्रक्रिया करण्यात आली होती. तेव्हापासून त्यांची प्रकृती ढासळत गेली.Veteran actor Kader Khan passes away at 81 in Canada

Post a Comment

 
Top