आघाडी काँग्रेसने नव्हे, तर सप आणि बसपने तोडली असेही आझाद म्हणाले
.
लखनौ - लोकसभा निवडणुकीत उत्तर प्रदेशच्या सर्वच 80 जागांवरून निवडणूक लढवणार असल्याचे काँग्रेसने रविवारी जाहीर केले आहे. उल्लेखनीय बाब म्हणजे, बसपच्या मायावती आणि सपच्या अखिलेश यादव यांनी राज्यात आघाडीची घोषणा केली. तसेच काँग्रेसला फक्त 2 जागा देणार असल्याचे जाहीर केले. पत्रकार परिषदेत काँग्रेसबद्दल विचारले असताना त्यांचा आपल्या आघाडीला काहीही फायदा होणार नाही असे मायावती म्हणाल्या होत्या. त्याच्या दुसऱ्याच दिवशी काँग्रेसचे नेते गुलाम नबी आझाद यांनी स्वतंत्ररित्या आणि स्वबळावर निवडणूक लढवण्याची घोषणा केली. राष्ट्रीय पातळीवर भाजपला आव्हान फक्त काँग्रेस अध्यक्ष राहुल गांधी देऊ शकतात असेही ते पुढे म्हणाले.
> काँग्रेस नेते गुलाम नबी आजाद म्हणाले, जनतेला माहिती आहे की आघाडी आम्ही (काँग्रेस) ने मोडलेली नाही. आम्ही आधीच म्हणालो होतो की भाजपला पराभूत करण्यास इच्छुक असलेल्या प्रत्येक पक्षासोबत आम्ही चर्चा करणार आहोत. परंतु, आमच्यावर कुणीही दबाव टाकू शकत नाही. समाजवादी पक्ष आणि बहुजन समाज पक्षानेच आघाडी मोडली आहे. आता आम्ही भाजपला पराभूत करण्यासाठी स्वबळावर निवडणूक लढवणार आहोत.
> तत्पूर्वी समाजवादी पक्ष आणि बहुजन समाज पक्षाने उत्तर प्रदेशात आघाडीची घोषणा केली. तसेच 80 लोकसभा जागांपैकी 38-38 जागा वाटून घेतल्या. उर्वरीत 4 पैकी रायबरेली आणि अमेठी अशा 2 जागा काँग्रेसला देणार असे जाहीर केले. लोकसभा निवडणुकीत आघाडीला काँग्रेसचा काहीच फायदा होणार नाही. तरीही अमेठी आणि रायबरेली येथून आपण उमेदवार देणार नाही. जेणेकरून भाजपविरोधी लढ्यात काँग्रेस या दोन जागांवरच व्यस्त राहणार नाही असे मायावती म्हणाल्या होत्या. उत्तर प्रदेशातून 2009 च्या लोकसभा निवडणुकीत काँग्रेसला 21 जागा मिळाल्या होत्या. तर 2014 च्या लोकसभा निवडणुकीत काँग्रेसला फक्त 2 जागा मिळाल्या आहेत. याच दोन जागा मायावती आणि अखिलेशने सोडल्या आहेत.

Post a Comment