0
महिलांची काढली छेड, हिसकावले दगिणे

मुंबई- शहराजवळील टूरिस्ट स्पॉट लोणावळ्यात गुजरातमधून फिरायला आलेल्या एका मुस्लिम कुटुंबावर स्थानीक लोकांकडून रॉड आणि दगडाने जीवघेणा हल्ला केल्याची घटना समोर आली आहे. या हल्यात कुटुंबातील 5 सदस्य गंभीर जखमी झाले आहेत. या हल्यात एका 7 वर्षीय बालकाचाही समावेश आहे, त्यांना लोणावळ्याच्या सरकारी रूग्णालयात भर्ती केले आहे.

जखमी झालेल्या लोकांमध्ये अहमद अब्दुल रज्जाक मेमन (25), सूफियान अब्दुल रज्जाक मेमन(29), राइसा अब्दुल रज्जाक मेमन(50), असीम रफीक मोतिवाला (28) आणि नसर मेमन इबाद मेमन हे आहेत. लोणावळा पोलिसांनी तक्रार दाखल करून तपास सुरू केला आहे.


महिलांची काढली छेड, हिसकावले दगिणे

पोलिसांनी सांगितले, घटना सोमवारी 14 जानेवारीला संध्याकाळी घडली. मकर संक्रांती साजरी करण्यासाठी गुजरातवरून एक मुस्लीम कुटुंबातील एकुण 25 लोक लोणावळ्याला फिरायला आले होते, त्यापैकी काहींनी उंटावरून फिरण्याची बुकींग केली होती. त्यांनी उंटावरून रपेट पूर्ण केली, त्यानंतर उंटाचे मालक ठरलेल्या रकमेपेक्षा जास्त पैसे मागू लागले. त्यानंतर त्यांच्यात वाद झाला आणि स्थानिकांनी त्यांच्यावर रॉड आणि दगडाने हल्ला केला. त्यांनी महिलांसोबत खराब वागणुक करत त्यांची छेड काढली आणि त्यांच्याजवळील 91,900 रूपयांचे दागिण, घड्याळ आणि कॅश हिसकावली.

बुधवारी दाखल झाली केस
हल्यानंतर कुटुंबाने पोलिसांकडे धाव घेतली, पण त्यांची तक्रार पोलिसांनी दाखल करून घेतली नाही. तुमच्या आपसातील प्रकरण आहे असे सांगुन त्यांना हकलवण्यात आले. दोन दिवसानंतर मुंबईतील एका आमदाराच्या हस्तक्षेपामुळे गुन्हा दाखल करण्यात आला आणि 4 आरोपी तानाजी शिवाजी राजावडे(20), चंद्रकांत यशवंत तकेव(31), विश्वास यशवंत तकेव(42) आणि राजेश बद्री जाधव (23) यांना अटक करण्यात आली.

muslim gujarati family attacked over Camel ride charges in lonawala

Post a Comment

 
Top