मंगळवार, 1 जानेवारीला मार्गशीर्ष कृष्ण पक्षातील एकादशी आहे. या दिवशी भगवान श्रीकृष्णांच्या बाळगोपाळ स्वरूपाती पूजा केल्याने सुख प्राप्ती होऊ शकते. श्रीकृष्णांचे बालस्वरूप लड्डू गोपाळची मूर्ती घरात ठेवण्याची प्रथा प्राचीन काळापासून चालत आली आहे. तुमच्या देवघरातही बाळगोपाळाची मूर्ती असेल तर पूजापाठ करताना काही गोष्टींकडे विशेष लक्ष द्यावे. उज्जैनच्या इंद्रेश्वर महादेव मंदिराचे पुजारी आणि ज्योतिर्विद पं. सुनील यांच्यानुसार जाणून घ्या, बाळगोपाळ पुजेशी संबंधित काही खास गोष्टी...
1. रोज सकाळ-संध्याकाळी श्रीकृष्णाला नैवेद्य दाखवताना नैवेद्यामध्ये तुळशीची पाने अवश्य टाकावीत. तुळशीशिवाय श्रीकृष्णाचा नैवेद्य पूर्ण होऊ शकत नाही.
2. बाळगोपाळाच्या पूजेपूर्वी आचमन करणे आवश्यक आहे. यासाठी सर्वात पहिले स्वतःचे हात स्वच्छ पाण्याने धुवून घ्यावेत आणि त्यानंतर श्रीकृष्णाच्या हातावर पाणी टाकावे. यासाठी सुगंधित फुलांच्या पाण्याचा उपयोग करावा.
3. पूजेमध्ये श्रीकृष्णाची मूर्ती आसनावर विराजित करावी. आसनाचा रंग पिवळा, लाल, नारंगी असावा.
4. ज्या भांड्यामध्ये श्रीकृष्णाचे पाय धुतले जातात त्याला पाद्य म्हणतात. पूजेपूर्वी पाद्यामध्ये स्वच्छ पाणी आणि फुलांच्या पाकळ्या टाकाव्यात आणि या पाण्याने देवाचे चरण धुवावेत.
5. दूध, दही, तूप, मध आणि साखर मिसळून पंचामृत तयार करावे आणि यामध्ये तुळशीचे पाने टाकून नैवेद्य दाखवावा.
6. पूजेमध्ये उपयोगात येणारे कुंकू, सहत, गुलाल, सुगंधित फुल, दुर्वा आणि शुद्ध पाण्याला पंचोपचार म्हटले जाते.
7. बाळगोपाळाच्या पुजेमध्ये गायीच्या दुधापासून बनवलेल्या तुपाचा उपयोग करावा.

Post a Comment