0

जेटली यांनी काँग्रेसवर आरोप केला की, त्यांच्या कार्यकाळात बँकांवर कर्ज देण्याचा दबाव होता.

नवी दिल्ली- राष्ट्रीय कंपनी कायदा लवादामध्ये ६६ प्रकरणांत बँकांची सुमारे ८० हजार कोटी रुपयांची वसुली झाली असल्याची माहिती अर्थमंत्री अरुण जेटली यांनी दिली. मार्चपर्यंत ७० हजार कोटी रुपये आणखी वसूल होण्याची अपेक्षा असल्याचेही त्यांनी सांगितले. जेटली यांनी काँग्रेसवर आरोप केला की, त्यांच्या कार्यकाळात बँकांवर कर्ज देण्याचा दबाव होता. त्यामुळे एनपीएमध्ये वाढ झाली आहे. एनडीए सरकारने एनपीए वसूल करण्यासाठी चांगली कारवाई केली, त्यासाठी दिवाळखोरी कायदा (आयबीसी) करण्यात आला असल्याचे त्यांनी सांगितले. जेटली यांनी 'इन्सॉल्व्हन्सी-बँकरप्सी कोडची दोन वर्षे' असे शीर्षक देत फेसबुकवर पोस्ट लिहिली असून त्यात हे लिहिले आहे.

जेटली यांच्या मते कंपन्यांना कंगाल आणि दिवाळखोरीत लोटणारे लोक व्यवस्थापनातूनच बाहेर झाले आहेत आणि नवीन व्यवस्थापनातील निवड अत्यंत पारदर्शक पद्धतीने झाली आहे. या प्रकरणात कोणत्याही प्रकारचा राजकीय किंवा सरकारी हस्तक्षेप करण्यात आलेला नाही. एनसीएलटीने सुमारे २.०२ लाख कोटी रुपयांच्या प्रकरणाचा निपटारा केला आहे. नवीन कायद्यामुळे एनपीएमधून स्टँडर्ड खात्यांत बदलण्याच्या दरात वाढ झाली आहे.
80,000 crores collected by banks: Jaitley

Post a Comment

 
Top