0
बटालियन 609' हा चित्रपट ११ जानेवारी, २०१९ रोजी रिलीज झाला. दूरदर्शनवरील कलाकार शोएब इब्राहिम या चित्रपटाच्या माध्यमातून चित्रपट सृष्टीत पदार्पण केले आहे. नारायणदास लालवाणी हे या चित्रपटाचे निर्माते आहेत आणि ब्रिजेश बटूकनाथ त्रिपाठी यांनी या चित्रपटाचे लेखन आणि दिग्दर्शन केले आहे.

बटालियन 609 या चित्रपटाची कथा ही भारतीय लष्कर आणि पाकिस्तानी लष्कर यांच्यातील क्रिकेट सामन्याभोवती गुंफलेली आहे. या संपूर्ण चित्रपटाची कथा ही बटालियन 609 मधील तालिबान विरोधात जीवाची बाजी लावणाऱ्या एका शूर सैनिकाची गोष्ट आहे. चित्रपटात भारतीय आणि पाकिस्तानी सैनिकांनी त्यांच्या मुख्य अधिकाऱ्यांच्या अपरोक्ष भारत-पाकिस्तानमधील तणावपूर्ण सीमेचे रक्षण करण्यासाठी योजलेली विलक्षण कल्पना मांडली आहे.     

नारायणदास लालवाणी यांनी या चित्रपटाची निर्मिती केली असून ब्रिजेश बटूकनाथ त्रिपाठी यांनी या चित्रपटाचे लेखन आणि दिग्दर्शन केले आहे. दूरदर्शनवरील प्रसिद्ध कलाकार शोएब इब्राहिम यांनी या चित्रपटाच्या माध्यमातून चित्रपट सृष्टीत पदार्पण केले आहे. छोट्या पडद्यावरील ससुराल सिमर का, कोई लौट के आये हैं, जीत गयी तो पिया मोरे अशा काही मालिकांमधून त्यांनी आपल्या अष्टपैलू अभिनयाची झलक दाखवली आहे.

चित्रपटाचे संगीत शैलेन्द्र सयंती यांनी दिले आहे. शोएब इब्राहिम, एलेना कझान, फर्नाज शेट्टी, विश्वास किनी, विकी अहुजा, सीपी ठाकूर, जशन सिंह कोहली आणि विकास श्रीवास्तव या कलाकारांनी या चित्रपटात भूमिका साकारली आहे.

शोएब इब्राहिमने म्हणाला, “मी बॉलीवूडमध्ये केव्हा पदार्पण करणार असे लोक मला विचारत होते आणि जी कथा माझ्या हृदयाला स्पर्श करेल अशाच भूमिका करेन असे मी सांगत असे. बटालियन 609 ही माझ्या स्वप्नातील भूमिका आहे.”

नारायणदास लालवाणी म्‍हणाले, “सर्जिकल स्ट्राईक्सबद्दल जागतिक स्तरावर मोठ्या प्रमाणात चर्चा झाली होती. निर्माता या नात्याने हा माझा पहिलाच चित्रपट असल्याने मोठ्या पडद्यावर याचे अर्थपूर्ण आणि चित्रपटाच्या दृष्टीने चित्रण करणे हे माझ्या आणि बटालियन 609 च्या संपूर्ण चमूच्या दृष्टीने महत्त्वाचे होते.”

ब्रिजेश बटूकनाथ त्रिपाठी म्हणाले, “माझे वडील भारतीय लष्करात अधिकारी होते आणि त्यामुळे मी सैनिकांचे आणि त्यांच्या कुटुंबियांचे आयुष्य फार जवळून अनुभवले आहे. मला ही पटकथा अतिशय आवडली आणि हा चित्रपट माझ्या मनाच्या जवळ जाणारा आहे. मला खात्री आहे की, प्रत्येक भारतीयाच्या मनाला स्पर्श करणारा हा चित्रपट आहे. आपले सैनिक आपल्यासाठी इतके काही करत असतात आणि आपल्या सुरक्षेसाठी आपल्या जीवाची बाजी लावत असतात. माझा चित्रपट मी भारतीय लष्कराला आणि देशासाठी नि:स्वार्थी भावनेने आपले आयुष्य पणाला लावण्यासाठी संपूर्ण सहकार्य करणाऱ्या त्यांच्या कुटुंबियांना अर्पण करत आहे.”


Post a Comment

 
Top