0
सवर्ण आरक्षणावर सर्वोच्च न्यायालयात सुनावणी

खुल्या गटातल्या आर्थिक दृष्ट्या दुर्बल गटाला 10 टक्के आरक्षण देण्याच्या निर्णयाला सुप्रीम कोर्टात आव्हान देण्यात आलं आहे.  'युथ फॉर इक्वेलिटी' या संस्थेच्या वतीने ही याचिका दाखल करण्यात आली आहे. याच महिन्यात केंद्र सरकारनं हा ऐतिहासिक निर्णय घेतला होता. लोकसभा आणि राज्यसभेत या कायद्याला बहुमताने मंजूरी दिला. कोर्टात हा निर्णय टिकेल का याची आता चर्चा सुरू झाली आहे.

फर्स्ट पोस्ट नॅशनल ट्रस्टचा निवडणूक सर्व्हे

आगामी लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर  फर्स्ट पोस्ट नॅशनल ट्रस्टचा निवडणूक सर्व्हे आज जाहीर होणार आहे. या सर्व्हेत आज निवडणुका झाल्यातर कुणाची सत्ता येईल, याबद्दलचा कौल देण्यात येणार आहे.

ठाकरे चित्रपट रिलीज

Ad

Sponsored by MGID
New Earthquake Shocks Indonesia - Will It Affect India?
शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या आयुष्यावर आधारीत 'ठाकरे' हा बायोपिक आज 25 जानेवारीला प्रेक्षकांच्या भेटीला येत आहे. या चित्रपटाची निर्मिती शिवसेनेचे राज्यसभेतील खासदार संजय राऊत यांनी केली आहे. तर त्याचे दिग्दर्शन अभितीत पानसे यांनी केले आहे.

गोव्यात नवा कायदा

गोव्यात आता नव्या कायद्यानुसार सार्वजनिक ठिकाणी जेवण बनवणे आणि दारू पिणे हे कायद्यानं गुन्हा ठरणार आहे. यामुळे आता पर्यटन व्यवसायाला धक्का बसणार आहे.

सीबीआयचे नवे प्रमुख कोण?

अलोक वर्मा यांच्या राजीनाम्यानंतर CBI चे नवे प्रमुख कोण असतील याची प्रचंड उत्सुकता निर्माण झाली आहे. निवड समितीची तातडीने बैठक बोलवावी, अशी आग्रही मागणी काँग्रेसने केली होती.  ही बैठक 25 जानेवारीला होणार असून त्यात नव्या प्रमुखांचं नाव जाहीर होणार आहे. त्यासाठी अनेक ज्येष्ठ अधिकाऱ्यांची नावं चर्चेत आहेत.


सवर्ण आरक्षणावर कोर्टात सुनावणी...आजच्या 5 महत्त्वाच्या बातम्या

Post a Comment

 
Top