आरोपी वेटर अचानक तिच्या रुममध्ये घुसला. सेल्फीच्या बहाण्याने त्याने महिलेची छेड काढली.
मुंबई- जूहु येथील एका पंचतारांकीत हॉटेलमध्ये कर्मचार्याने 35 वर्षीय कॅनडीयन महिलेसोबत सेल्फीच्या बहाण्याने अभद्र कृत्य केले आहे. महिलेच्या तक्रारीनंतर पोलिसांनी आरोपीला अटक केली आहे.
जुहू पोलिसांनी दिलेली माहिती अशी की, सुमीत राव (32) असे आरोपीचे नाव आहे. महिलेची कथित छेड काढल्याप्रकरणी त्याला अटक करण्यात आली आहे.
पीडित महिला इव्हेंट मॅनेजमेंट कंपनीत नोकरी करते. ती कामानिमित्त कायम भारतात येते. महिलेने पोलिसांना सांगितले की, ती जुहूमधील हॉटेलमध्ये थांबली होती. या दरम्यान, आरोपी वेटर अचानक तिच्या रुममध्ये घुसला. सेल्फीच्या बहाण्याने त्याने महिलेची छेड काढली. महिलेने याबाबत हॉटेल प्रशासनाला माहिती दिली. त्यांना सांताक्रूझ पोलिस स्टेशनमध्ये या प्रकरणी तक्रार दाखल केली.

Post a Comment