0
स्कूल बसचा ड्रायव्हर नशेत गाडी चालवत होता असेही सांगितले जात आहे.
गुंटूर - आंध्र प्रदेशच्या गुंटूर जिल्ह्यात सोमवारी सकाळी शालेय बसला भीषण अपघात झाला आहे. जवळपास 50 विद्यार्थ्यांना घेऊन जाणारी ही बस पुलावरून कोसळली. या अपघातात किमान 15 विद्यार्थी जखमी झाले असून त्यापैकी 3 जण गंभीर आहेत. सर्वच विद्यार्थ्यांना उपचारासाठी जवळच्या सरकारी रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.
चालक पोलिसांच्या ताब्यात

> गुंटूर जिल्ह्यातील एका पुलावरून जात असताना सोमवारी सकाळी ही शालेय बस घसरली. तसेच पुलाखाली पलटल्याने अनेक विद्यार्थी जखमी झाले. स्थानिकांनी वेळीच बचावकार्य सुरू करताना पोलिसांना घटनास्थळी बोलावले. तसेच सर्व विद्यार्थ्यांना रुग्णालयात पाठवण्याची व्यवस्था केली. बसच्या चालकाची चौकशी केली असता तो नशेत असल्याचे समजले. यानंतर पोलिसांनी चालकाला ताब्यात घेतले असून त्याची चौकशी सुरू आहे.

> बस आणि त्यातील सर्वच विद्यार्थी गुंटूरच्या कृष्णावेणी टॅलेंट स्कूलचे होते. तसेच ही बस सोमवारी सकाळी शाळेच्या दिशेने जात होती. घटनास्थळावरून समोर आलेल्या व्हिडिओ आणि फोटोंमध्ये बस उलटल्याचे दिसून येत आहे. सोबतच, सभोवताल जमलेली गर्दी आणि लहान मुलांचे टिफीन तसेच स्कूल बॅग सुद्धा दिसत आहेत.
School Bus Carrying 50 Children Falls Into Culvert In Andhra Pradesh

Post a comment

 
Top