भीमा कोरेगावात गतवर्षी याच दिवशी हिंसाचार भडकला होता.
- पुणे - भीमा-कोरेगाव युद्धाला 201 वर्षे पूर्ण होत असल्यानिमित्त विविध दलित संघटनांनी येथे रॅली आयोजित केल्या आहेत. शौर्य दिवस म्हणून पाळल्या जाणाऱ्या या दिवशी 5 लाखांहून अधिक लोक जमा होतील अशी शक्यता वर्तवली जात आहे. या सभेत कुठलाही अनुचित प्रकार टाळण्यासाठी 7000 जवान तैनात करण्यात आले आहेत. सोबतच ड्रोन आणि सीसीटीव्हीच्या माध्यमातून नजर ठेवली जात आहे. गतवर्षी याच दिवशी अशा प्रकारची मोठी सभा आयोजित करण्यात आली. त्यामध्ये हिंसाचार उसळला होता.
500 सीसीटीव्ही, 11 ड्रोनची नजर
पुण्याचे जिल्हाधिकारी नवलकिशोर राम यांनी दिलेल्या माहितीनुसार, भीमा-कोरेगांवच्या विजय स्तंभावर एक जानेवारी रोजी पाच लाख लोक एकत्रित येण्याचा अंदाज आहे. इतक्या मोठ्या संख्येने येणाऱ्या लोकांच्या सुरक्षेसाठी प्रशासनाने 500 सीसीटीव्ही, 11 ड्रोन कॅमेरे आणि 40 व्हिडिओ कॅमेरे लावले आहेत. केंद्रीय मंत्री रामदास आठवले आणि डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचे वंशज आनंद राज अंबेडकर येथे सभेला संबोधित करणार आहेत.पुणे - भीमा-कोरेगाव युद्धाला 201 वर्षे पूर्ण होत असल्यानिमित्त विविध दलित संघटनांनी येथे रॅली आयोजित केल्या आहेत. शौर्य दिवस म्हणून पाळल्या जाणाऱ्या या दिवशी 5 लाखांहून अधिक लोक जमा होतील अशी शक्यता वर्तवली जात आहे. या सभेत कुठलाही अनुचित प्रकार टाळण्यासाठी 7000 जवान तैनात करण्यात आले आहेत. सोबतच ड्रोन आणि सीसीटीव्हीच्या माध्यमातून नजर ठेवली जात आहे. गतवर्षी याच दिवशी अशा प्रकारची मोठी सभा आयोजित करण्यात आली. त्यामध्ये हिंसाचार उसळला होता.
500 सीसीटीव्ही, 11 ड्रोनची नजर
पुण्याचे जिल्हाधिकारी नवलकिशोर राम यांनी दिलेल्या माहितीनुसार, भीमा-कोरेगांवच्या विजय स्तंभावर एक जानेवारी रोजी पाच लाख लोक एकत्रित येण्याचा अंदाज आहे. इतक्या मोठ्या संख्येने येणाऱ्या लोकांच्या सुरक्षेसाठी प्रशासनाने 500 सीसीटीव्ही, 11 ड्रोन कॅमेरे आणि 40 व्हिडिओ कॅमेरे लावले आहेत. केंद्रीय मंत्री रामदास आठवले आणि डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचे वंशज आनंद राज अंबेडकर येथे सभेला संबोधित करणार आहेत.
इंटरनेट तात्पुरते बंद, सोशल मीडियावरही करडी नजर
पुणे (ग्रामीण) चे पोलिस अधीक्षक संदीप पाटील यांनी सांगितल्याप्रमाणे, सभेच्या पार्श्वभूमीवर सोशल मीडियावर द्वेष पसरवणारे अनेक संदेश पाहिले. यानंतर अफवांवर लगाम लावण्यासाठी परिसरात इंटरनेट सेवा तात्पुरती बंद करण्यात आली आहे. सोबतच पोलिसांनी सुरक्षेचा उपाय म्हणून अनेकांना नजरकैद केले आहे. भीमा कोरागावात एसआरपीएफ, रॅपिड अॅक्शन फोर्स, होमगार्ड्ससह बॉम्ब शोध पथकाच्या 12 कंपन्या तैनात करण्यात आल्या आहेत.
Post a Comment