ही घटना मंगळवारी दुपारी एक वाजेच्या सुमारास धडगाव तालुक्यातील भूषा येथे घडली.
धडगाव/नवापूर/नंदुरबार- मकरसंक्रांतीनिमित्त नर्मदा नदीवरील भूषा पॉइंट या पवित्रस्थळी स्नानास गेलेल्या आदिवासी भाविकांवर संक्रांत ओढवली. नदीच्या एका काठावरून दुसऱ्या काठावर जात असताना बोट उलटून पाच जणांचा मृत्यू झाला. सुदैवाने किनाऱ्यापासून १५ फूट अंतरावरच ही दुर्घटना घडली. त्यामुळे वेळीच मदत मिळाल्याने इतर ४० भाविकांना वाचवण्यात यश आले.
ही घटना मंगळवारी दुपारी एक वाजेच्या सुमारास धडगाव तालुक्यातील भूषा येथे घडली. दरम्यान, मृतांच्या कुटुंबीयांना शासनातर्फे प्रत्येकी दोन लाख रुपये मदतीची घोषणा पालकमंत्री जयकुमार रावल यांनी केली. दरवर्षाप्रमाणे मकरसंक्रांतीला भूषा येथून नर्मदा नदीच्या दुसऱ्या काठावर आदिवासी बांधव एकत्र जमतात. त्याठिकाणी नवस. स्नान आणि निसर्गाची पूजा करतात. मंगळवारी मकरसंक्रांतीनिमित्त एका बंदिस्त बोटीत ७० ते ८० भाविक भूषा पॉइंट येथून नर्मदा नदीच्या मध्यभागी असलेल्या एका बेटावर जाणार होते. मात्र, भूषा येथे १५ फूट अंतरावरच बोट उलटली. घटनास्थळी माेठा जमाव जमला हाेता. काहीजण मोबाइलमध्ये घटनेचे चित्रीकरण करण्यात व मृतदेहाचे फाेटाे काढण्यात व्यस्त हाेते. घटनेचे गांभीर्य नसलेल्या या लाेकांबद्दल संताप व्यक्त केला जात हाेता.
यासाठी भूषा आहे प्रसिद्ध :
भूषा गाव उदय आणि नर्मदाच्या नदीच्या संगमावर वसले आहे. संक्रांतीला या ठिकाणी भाविक निसर्गाची पूजा आणि अंघोळ करतात. तेथे सर्व आदिवासी भाविक एकत्र येतात. त्यासाठी ते भूषा येथून बोटीने दुसऱ्या काठावर (मध्य प्रदेश) जातात. भूषा हे गुजरात, मध्य प्रदेश आणि महाराष्ट्र अशा तीन राज्यांची सीमा आहे.
काठावरच्या प्रत्यक्षदर्शीने सांगितले....
बालक, महिलांनी मारल्या किंचाळ्या
क्षमतेपेक्षा जास्त भाविक बोटमध्ये बसले. बोट सुरू होताच काही क्षणांत बोट उलटली. ही बोट बंदिस्त असल्यामुळे पाण्यात भाविकांना गुदमरू लागले. महिला व बालकांनी जिवाच्या अाकांताने आरोळ्याही मारल्या. तेव्हा काही युवक मदतीला धावून गेले, अशी माहिती प्रत्यक्षदर्शी भाविक दिलीप पावरा यांनी दिली. 'मकरसंक्रांतीनिमित्ताने आम्ही उदय नदी व नर्मदा नदीच्या संगमावर स्नानासाठी गेलाे होतोे. दुपारी तीनच्या सुमारास २५ किमी अंतरावरून तेलखेडी गावातील भाविक दोन वाहनांमधून आले. ते सर्व एकाच बोटीत बसले. एवढे लोक बसू नका, असे आम्ही समजावले, मात्र त्यांनी ऐकले नाही.
जवळपास ७० पेक्षा अधिक भाविक बसले. गर्दी पाहून मी आणि माझा मित्र बोटमधून उतरलो. ते भाविक नदीतील एका बेटावर स्वयंपाक करून जेवण करणार होते. मात्र, काही फुटावरच बोट उलटली. बंदिस्त बोट असल्याने भाविक पाण्यात गुदमरू लागेल. त्यामुळे महिला व लहान बालके आरोळ्या मारत होते. बोटचे वजन जास्त असल्याने सरळ करणे शक्य नव्हते. त्यावेळी ट्रॅक्टर व ग्रामस्थांचा मदतीने तासाभरात बोट सरळ केली. तो पर्यंतबराच उशीर झाला होता. चार बालक व एक महिलेचा मृत्यू झाला. तासाभरानंतर तीन तरंग रुग्णवाहिका घटनास्थळी दाखल झाल्या. गंभीर जखमींवर उपचार करण्यात आले.
नवस फेडून परतणाऱ्या ट्रॅक्टरलाही अपघात; ४० भाविक जखमी
भूषाजवळ मंगळवारीच आणखी एक दुर्घटना घडली. नवस फेडून परतत असताना भाविकांचा ट्रॅक्टर उलटल्याने ४० जण जखमी झाले. यात चार जण गंभीर जखमी असून त्यांन नंदुरबारच्या रुग्णालयात हलविण्यात आले.

Post a Comment