0
कँसरग्रस्त सोनाली बेंद्रेने बर्थडेला पतीला Kiss करत खाऊ घातला केक

एन्टटेन्मेंट डेस्क. मंगळवारी म्हणजे 1 जानेवारीला बॉलिवूड अभिनेत्री विद्या बालन आणि सोनाली बेंद्रे दोघींचाही वाढदिवस होता. दोघींनी कुटूंब आणि फ्रेंड्ससोबत वाढदिवस सेलिब्रेट केला. विद्या बालनने आपला 40 वा वाढदिवस घरीच फॅमिलीसोबत सेलिब्रेट केला. यावेळी तिचे संपुर्ण कुटूंब रेट्रोल लूकमध्ये दिसले. यावेळी विद्याने डार्क ग्रीन कलरचा गाऊन घातला होता आणि तिने कर्ली हेअरस्टाइल बनवली होती. विद्याला बर्थडे विश करण्यासाठी मीडिया फोटोग्राफर्स पोहोचले होते. तिने कॅप घालून फोटोग्राफर्सला खुप पोज दिल्या.


सोनालीनेही सेलिब्रेट केला वाढदिवस
- कँसरग्रस्त सोनाली बेंद्रेनेही आपला वाढदिवस सेलिब्रेट केला. सोनालीच्या बर्थडे सेलिब्रेशनचे काही व्हिडिओज समोर आले आहेत. सोनालीने मीडिया फोटोग्राफर्सला पोज दिले. तसेच कॅमेरामनला केकही खाऊ घातला.
- सोनालीचा एक फोटो सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. यामध्ये पती गोल्डी बहलला किस करताना केक खाऊ घालत आहे.
- सोनालीच्या वाढदिवसाच्या पार्टीमध्ये ऋतिक रोशनची एक्स वाइफ सुजैन आणि दोन्ही मुलंही पोहोचले होते. यासोबतच कुणाल कपूर पत्नी नैना बच्चनसोबत पोहोचला होता.

Post a Comment

 
Top