सरकारचा आणखी एक प्रस्ताव आहे तो म्हणजे शेतकऱ्यांना विना हमी कर्ज. याची रक्कम 2 ते 3 लाख असेल.
नवी दिल्ली - केंद्रातील एनडीए सरकार शेतकऱ्यांसाठी बिनव्याजी कर्ज देण्यासाठी आणि त्यांचे उत्पन्न वाढवण्यासाठी पॅकेजचा विराच करत असल्याची माहिती मिळाली आहे. सुत्रांच्या मते, कृषी मंत्रालय याबाबत नीती आयोगाशी चर्चा करत असून त्यानुसार योजना आखली जाणार आहे. त्यात छोट्या शेतकऱ्यांचे उत्पन्न वाढवण्यासाठी आर्थिक मदतीसह 3 लाखांपर्यंत बिनव्याजी कर्जाचा समावेशही असेल.
सरकार सध्या वेळेवर कर्ज फेडणाऱ्या शेतकऱ्यांना बिनव्याजी कर्ज देते. बँका बिनव्याजी कर्ज द्यायला तयार नसतात. पण सरकारने व्याजाची जबाबदारी घेतल्यास यासाठी तयार असल्याचे बँकांचे म्हणणे आहे. सरकार आणि बँकांच्या अधिकाऱ्यांमध्ये याबाबत चर्चा सुरू आहे. सरकारचा आणखी एक प्रस्ताव आहे तो म्हणजे शेतकऱ्यांना विना हमी कर्ज. याची रक्कम 2 ते 3 लाख असेल.

Post a Comment