येत्या शनिवारी 26 जानेवारीला प्रजासत्ताक दिनानिमित्त शिवाजी पार्क येथे होणाऱ्या पथसंचलनात सैन्यदल, पोलीस दल, राज्य राखीव पोलीस दल, फायर ब्रिगेड यांच्यासोबत महापालिकेच्या शाळांमधील 380 विद्यार्थीदेखील सहभागी होणार आहेत. स्काऊट-गाईडचे 200 आणि आरएसपीचे 180 विद्यार्थी- विद्यार्थिनी यांचा यात समावेश आहे. मान्यवरांना सलामी देण्याचा बहुमान या विद्यार्थ्यांना मिळणार आहे.
प्रजासत्ताकदिनी दरवर्षी शिवाजी पार्क मैदानात राज्य सरकारच्या वतीने कार्यक्रमाचे आयोजन केले जाते. या वर्षी या कार्यक्रमादरम्यान 100 स्काऊट (विद्यार्थी), 100 गाईड (विद्यार्थिनी) आणि रस्ता सुरक्षा पथकातील 90 विद्यार्थी आणि 90 विद्यार्थिनींचा समावेश आहे अशी माहिती अतिरिक्त महापालिका आयुक्त आबासाहेब जऱहाड यांनी दिली. महापालिकेच्या शाळांमधील 28 हजार विद्यार्थी हे आपल्या नियमित शैक्षणिक उपक्रमांसोबतच स्काऊट – गाईडच्या उपक्रमातदेखील सहभागी असतात. तसेच पालिकेच्या शाळांमध्ये ‘रस्ता सुरक्षा दल’ विषयक उपक्रमाचे 150 पथक कार्यरत असून त्यात पालिका शाळांमधील 6 हजार विद्यार्थी सहभागी आहेत. गणेशोत्सव – महापरिनिर्वाण दिन इत्यादी प्रसंगी वाहतूक पोलिसांसमवेत प्रत्यक्ष रस्त्यावर उभे राहून वाहतूक नियंत्रणास मदत करण्याचे काम करतात.
दहावीतील विद्यार्थ्यांना मिळणार 10 अतिरिक्त गुण
विशेष म्हणजे या पथकात असणाऱ्या दहावीच्या विद्यार्थ्यांना नियमानुसार अतिरिक्त 10 गुणदेखील दिले जाणार आहेत.

Post a Comment