0

घोटाळ्याचा मुख्य सूत्रधार अब्दुल करीम तेलगीची अखेर मृत्यूनेच केली 'सुटका'

नाशिक - कथित ३२ हजार कोटी रुपयांच्या बनावट मुद्रांक घोटाळ्यातील आरपीएफच्या (रेल्वे सुरक्षा दल) सात कर्मचाऱ्यांची जिल्हा व सत्र न्यायालयाने सोमवारी सबळ पुराव्याअभावी निर्दोष मुक्तता केली. मुख्य सूत्रधार अब्दुल करीम तेलगी याचा २०१७ मध्येच मृत्यू झाल्यामुळे त्यासंदर्भात निकाल दिला गेला नाही.

नाशिकच्या भारत प्रतिभूती मुद्रणालयाच्या रेल्वे वॅगनमधून कोट्यवधी रुपयांचे स्टॅम्प गायब करण्यात आले होते. या प्रकरणात अब्दुल करीम तेलगीसह ७ अारपीएफ अधिकाऱ्यांवर आरोप हाेते. जवळपास १४ वर्ष चाललेल्या खटल्यात ४९ साक्षीदार, पुरावे सादर करण्यात अाले. मात्र, सीबीअायच्या पुराव्यांनी समाधान न झाल्यामुळे न्यायालयाने सातही आरोपी कर्मचाऱ्यांची निर्दोष मुक्तता केली.
घोटाळ्याचा मुख्य सूत्रधार अब्दुल करीम तेलगीची अखेर मृत्यूनेच केली 'सुटका' 
हे होते आरोपी : सीबीआयने तेलगीसह आरपीएफचे रामभाऊ पवार, बिरजी किशोर तिवारी, विलासचंद्र जोशी, प्रमोद ढाके, मोहंमद सरवार, विलास मोरे आणि ज्ञानदेव वारके यांच्याविरुद्ध २५ ऑगस्ट २००४ मध्ये दोषारोपपत्र सादर केले. ५ फेब्रुवारी २०१५ मध्ये आरोप निश्चित झाले.
मालमत्ता सरकारजमा 
तेलगीच्या मृत्यूनंतर पत्नी शाहिदाने त्याची मालमत्ता सरकारजमा करण्याचा विशेष अर्ज कोर्टाकडे केला होता.काही प्रकरणांत पत्नीलाही आरोपी करण्यात आले होते.
२०१७ मध्ये कैदेतच मृत्यू 
तेलगीला प्रकरणातील विविध गुन्ह्यांत एकूण ३० वर्षांची शिक्षा आणि २०२ कोटींचा दंड ठोठावण्यात आला होता. तो बंगळुरूच्या तुरुंगात शिक्षे भोगत असताना मेनिनजायटिस आजाराने तेलगीचा २६ ऑक्टोबर २०१७ राेजी सरकारी रुग्णालयात मृत्यू झाला.
स्टॅम्पपेपर चोरले, भंगारातील मशिनवर छापून विकले 
आरोपांनुसार, तेलगीने आरपीएफ अधिकाऱ्यांच्या मदतीने इंडिया सिक्युरिटी प्रेसमध्ये कोरे स्टॅम्पपेपर रेल्वे वॅगनमधून गायब केले. नंतर भंगारातून स्क्रॅप मशीन विकत घेतले. त्यावर कोट्यवधींचे बनावट मुद्रांक छापले. सुमारे ४०० एजंटमार्फत बँका, विमा कंपनी, ब्रोकरेज फर्म, बड्या उद्योगपतींना हे मुद्रांक विकले. याप्रकरणात बऱ्याच मंत्र्यांसह बड्या नेत्यांची नावे आली होती.
या प्रकरणामध्ये 'अॅबेट' लागू 
विधिज्ञांनुसार, खटला सुरू असताना अाराेपी मृत झाल्यास त्याच्याशी संबधित पुढील निर्णय हाेत नसताे. कायद्याच्या भाषेत त्यास अॅबेट (abate) असे म्हटले जाते. तेलगीचा शिक्षेदरम्यान मृत्यू झाल्यामुळे या प्रकरणातही 'अॅबेट' लागू झाल्याचे आरोपींचे वकील अँड एम. वाय. काळे यांनीही स्पष्ट केले.7 Accused Cleared In Stamp Paper Scam Case

Post a Comment

 
Top