0
राज्यात सोमवारी स्वाइन फ्लूचे आणखी 102 नवे रुग्ण सापडले आहेत.

जयपूर - राजस्थानच्या 33 पैकी 31 जिल्ह्यांत स्वाइन फ्लूचे नवीन रुग्ण सापडले असून अख्खे राज्य या रोगाच्या विळख्यात सापडले आहे. गेल्या 21 दिवसांत राजस्थानमध्ये स्वाइन फ्लूमुळे 51 जणांच्या मृत्यूची नोंद झाली आहे. ह्या नोंदी 1 जानेवारी ते 21 जानेवारी दरम्यान करण्यात आल्या. त्यातच सोमवारी आणखी 102 नवे रुग्ण सापडले आहेत. फक्त जानेवारीची आकडेवारी पाहिल्यास या महिन्यात नवीन रुग्णांचा आकडा 1335 पर्यंत पोहोचला. यात एकट्या जयपूरच्या 47 रुग्णांचा समावेश आहे.



स्वाइन फ्लूचे सर्वाधिक बळी याच राज्यात
जयपूरमध्ये स्वाइन फ्लूचे 5 बळी गेले आहेत. तर सीकर, नागौर, उदयपूरमध्ये प्रत्येकी 3-3 जणांच्या मृत्यूची नोंद झाली. अजमेर, टोंक, पाली, जालोर, बीकानेर, चुरू, राजसमंद आणि श्रीगंगानगरमध्ये प्रत्येकी एक-एक रुग्णाचा बळी गेला. तसेच जैसलमेर, बाडमेर, प्रतापगड आणि कोटा या जिल्ह्यांमध्ये 2-2 जण मृत्यूमुखी पावल्याचे वृत्त आहे. झीकानंतर आता स्वाइन फ्लू गस्त राज्य म्हणून राजस्थान देशात सर्वात वाइट ठरला आहे.

सरकार आकडेवारी लपवत असल्याचे विरोधकांचे आरोप
राजस्थानचे माजी आरोग्य मंत्री कालीचरण सराफ यांनी सरकारवर आकडेवारी लपवण्याचा आरोप लावला आहे. "देशभर स्वाइन फ्लूने जेवढे मृत्यू झाले त्याहून अधिक गेल्या 20 दिवसांत राजस्थानात बळी गेले आहेत. सरकार काही कारवाई करणे सोडून फक्त आकडेवारी लपवण्याकडे लक्ष देत आहे. सरकारने रेलवे स्टेशन, शाळांमध्ये स्क्रीनिंगची काहीच व्यवस्था केली नाही." असा आरोप त्यांनी लावला आहे.

Swine Flu hits 31 districts of Rajasthan, 51 killed in 21 days

Post a Comment

 
Top