0
हैदराबाद येथील हुसेन सागराच्या धर्तीवर उभारला जातोय पार्क, ३० फूट उंच मूर्तीची मोती तलावात होणार स्थापना

हैदराबाद येथील हुसैन सागरच्या धर्तीवर जालना शहरातील मोती तलावात लॉर्ड बुद्धा पार्क उभारला जात आहे. यात तलावाच्या मधोमध २० हजार चौरस फूट क्षेत्रावर चौथरा तयार करून ३० फूट उंच व १० फूट रुंद तथागत गौतम बुद्धांची मूर्ती उभारली जाईल.


भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांना अभिप्रेत असलेली स्मितहास्य करणारी ही मूर्ती असणार आहे. औरंगाबाद येथील प्रसिद्धी मूर्तीकर सुनील देवरे हे बुद्धांची मूर्ती साकारत असून सध्या ही मूर्ती तयार झालेली आहे. प्रतीक्षा आहे फक्त स्थापनेची.


लॉर्ड बुद्धा पार्कसाठी दीड कोटी
लॉर्ड बुद्धा पार्कच्या कामासाठी अंदाजित दीड कोटी रुपयांचा खर्च अपेक्षित असून यातील ७५ लाख रुपये मूर्तीकाराचे मानधन दिले जाणार आहे, तर उर्वरित ७५ लाख रुपये चौथरा, एक किलोमीटरचा रोपवे व अन्य कामासाठी लागणार असल्याची माहिती संस्थापक सचिव दिनकर घेवंदे यांनी "दिव्य मराठी'शी बोलताना दिली.
Budhhas stachu will in Aurangabad jalna

Post a Comment

 
Top