0
सलमान खानने ‘दबंग 3’ नक्की बनणार, असे जाहिर केले आणि चाहत्यांची उत्कंठा शिगेला पोहोचली. तेव्हापासून चाहते या चित्रपटाकडे डोळे लावून बसलेत. याच चाहत्यांसाठी एक आनंदाची बातमी आहे.

ठळक मुद्दे
खरे तर सलमान खान २०१८च्या अखेरिस ‘दबंग 3’ चे शूटींग सुरू करणार होता. ‘भारत’ आणि ‘दबंग 3’  हे दोन्ही चित्रपट एकाचवेळी शूट करण्याचा सलमानचा प्लान होता.   पण ‘रेस3’ रिलीज झाल्यानंतर सलमानने अचानक आपला प्लान बदलला आणि केवळ ‘भारत’चे शूटींग सुरू केले.

येत्या एप्रिलपासून ‘दबंग 3’चे शूटींग सुरु होणार आहे. ‘दबंग 3’ची हिरोईन सोनाक्षी सिन्हाने खुद्द हा खुलासा केला आहे.
एका ताज्या मुलाखतीत सोनाक्षी ‘दबंग 3’वर बोलली. लवकरच मी एका मॅगझिनच्या फोटोशूटसाठी मकाऊला जाणार आहे. यानंतर लगेच ‘मिशन मंगल’चे शेवटचे शूटींग शेड्यूल पूर्ण करणार आहे. हे शूटींग संपल्यावर ‘कलंक’च्या शूटींगसाठी भोपाळला जाणार आहे. यानंतर मी ‘दबंग 3’चे शूटींग सुरु करेल,असे सोनाक्षीने या मुलाखतीत सांगितले. एकंदर काय तर ‘दबंग 3’ येणार हे पक्के आहे. 
 खरे तर सलमान खान २०१८च्या अखेरिस ‘दबंग 3’ चे शूटींग सुरू करणार होता. ‘भारत’ आणि ‘दबंग 3’  हे दोन्ही चित्रपट एकाचवेळी शूट करण्याचा सलमानचा प्लान होता.   पण ‘रेस3’ रिलीज झाल्यानंतर सलमानने अचानक आपला प्लान बदलला आणि केवळ ‘भारत’चे शूटींग सुरू केले. असे का? तर सलमान खान एका वेळी केवळ एकाच चित्रपटावर लक्ष देऊ इच्छित होता. त्यामुळे त्याने  केवळ ‘भारत’चे शूटींग सुरू केले. या चित्रपटाचे शूटींग संपल्याबरोबर तो ‘दबंग 3’चे शूटींग सुरू करेल,असे अरबाजने नकतेच एका मुलाखतीत सांगितले होते. ‘दबंग 3’मध्ये सलमान व सोनाक्षी सिन्हा यांच्याशिवाय आणखी एक अभिनेत्री महत्त्वपूर्ण भूमिकेत दिसणार आहे. या हिरोईनचे नाव अद्याप गुलदस्त्यात आहे. 
तूतार्स सलमान खान ‘भारत’च्या शूटींगमध्ये बिझी आहे. या चित्रपटात सलमानशिवाय कॅटरिना कैफ, दिशा पटनी, तब्बू मुख्य भूमिकेत आहेत.
Sonakshi Sinha to start shooting for Dabangg 3 soon | सोनाक्षी सिन्हाचा मोठा खुलासा! ‘या’ महिन्यात सुरु होणार ‘दबंग 3’चे शूटींग!!

Post a Comment

 
Top