0
सातव्या वेतन आयोगाच्या मागणीसाठी पुढील आठवडय़ात संप पुकारण्याच्या निर्णयावर राज्यातील चतुर्थ श्रेणी कर्मचारी ठाम असून मुंबईतल्या जे. जे., सेंट जॉर्जसह राज्यातल्या सर्व प्रमुख सरकारी रुग्णालयांच्या बाहेर आज गेट मीटिंग झाली. 29 व 30 जानेवारी रोजी राज्यातील सर्व सरकारी रुग्णालयांतील सुमारे दीड लाख कर्मचाऱ्यांनी काम थांबवण्याचा निर्णय या बैठकीत घेण्यात आला. मुंबई, ठाणे, पुणे, नागपूर व रत्नागिरीतील मनोरुग्णालयातील चतुर्थ श्रेणी कर्मचारी संपावर ठाम असल्याचे संघटनेचे अध्यक्ष भाऊसाहेब पठाण म्हणाले.

Post a comment

 
Top