पहिल्या टप्प्यात विविध विभागांमधील भरतीसाठी इच्छुक उमेदवारांना २५ जानेवारीपर्यंत ऑनलाईन अर्ज करण्याची मुदत आहे.

नाशिक- राज्य शासनातर्फे ७२ हजार जागांची मेेगाभरती सुरू असून पहिल्या टप्प्यामधील २८ हजार ७०० जागांपैकी सर्वाधिक जागा या भारतीय रेल्वे, महापालिका व जिल्हा परिषद या स्थानिक स्वराज्य संस्थांमधील आहे. सुमारे २६ हजार जागांची भरती केली जाणार असून त्यात रेल्वेतील १४ हजार तर पालिका व जि. प. मधील १२ हजार जागा भरल्या जाणार आहे. पहिल्या टप्प्यात विविध विभागांमधील भरतीसाठी इच्छुक उमेदवारांना २५ जानेवारीपर्यंत ऑनलाईन अर्ज करण्याची मुदत आहे. दुसऱ्या टप्प्यातील मेगाभरतीच्याही जाहिराती प्रसिद्ध झाल्या असून त्यासाठी ८ फेब्रुवारीपर्यंत अर्ज करण्याची अंतिम मुदत आहे. मेगा भरतीची संपूर्ण प्रक्रिया व परीक्षा १५ फेब्रुवारी ते ३१ मार्च २०१९ पर्यंत पूर्ण केली जाणार आहे.
एवढ्या मोठ्या संख्येने जागा भरल्या जाणार असल्याने युवकांना या संधीचा फायदा होणार आहे. इच्छुक उमेदवारांना www.mahapariksha.gov.in या संकेतस्थळावर विद्यार्थ्यांना अर्ज करता येईल. या संकेतस्थळावर जाहिरातीही प्रसिद्ध झाल्या आहे. भरतीची संपूर्ण माहिती उपलब्ध करून देण्यात आली आहे. खुल्या प्रवर्गासाठी ४०० रुपये तर मागास प्रवर्गासाठी २०० रुपये शुल्क असणार आहे. खुल्या प्रवर्गासाठीची वयोमर्यादा १८ ते ३८ व मागास प्रवर्गासाठी १८ ते ४५ एवढी निश्चित करण्यात आली आहे.
अशी होईल मेगाभरती
कृषिसेवक- १४१६- २५ जानेवारी
क. अभियंता बांधकाम विभाग- ४०५- २५ जानेवारी
रेल्वे- १४०३३- २५ जानेवारी
जि. प.- १२०००- २५ जानेवारी
मुंबई पालिका- २९१- २० जानेवारी
एसटीआय, पीएसआय, एएसओ- ५५५- २९ जानेवारी
वनरक्षक - ९०० - ३ फेब्रुवारी
एसटी- ४४१६- ८ फेब्रुवारी

Post a Comment