0
कंपन्या : तोटा कमी होणार

नवी दिल्ली- विमान इंधनाच्या (एटीएफ) दरात मंगळवारी आजवरची सर्वात मोठी १४.७% कपात झाली. मंगळवारी दिल्लीत एटीएफचा दर ५८,०६० रुपये प्रति किलोलिटर होता. ताे ३० नोव्हेंबर ७६,३७८ रुपये किलोलिटर म्हणजे ७६.४ रुपये लिटर होता. आता हे दर ५८ रुपयांवर आले आहेत. या हिशेबाने एका महिन्यात दोन वेळा दर २६.६% घटले आहेत. तेल कंपन्यांनुसार, आंतरराष्ट्रीय बाजारात कच्चे तेल स्वस्त झाल्याने ही कपात करण्यात आली आहे.

कंपन्या : तोटा कमी होणार
विमान कंपन्यांच्या खर्चात ३५-४०% वाटा इंधनाचाच असतो. इंडिगोला एप्रिल-जून तिमाहीत २८ कोटींचा नफा झाला. मात्र पुढच्या तिमाहीत ६५२ कोटींचा तोटा. दरम्यान, एटीएफ ७० रु. लिटर होते. आता हे दर १२ रुपयांनी घटले आहेत. कच्चे तेल ५७.८ डॉलर प्रतिबॅरल आहे. ते नोव्हेंबरमध्ये ६५ डॉलर होते. ते ११% स्वस्त झाले आहे.
Air fuel 26% cheaper

Post a Comment

 
Top