0
मनोज लोहार यांनी डॉ. महाजन यांचे अपहरण करून वेगवेगळ्या दोन ठिकाणी डांबून ठेवले होते.
जळगाव- जिल्हा परिषदेच्या माजी सदस्याचे अपहरण करुन खंडणी मागितल्याप्रकरणी पोलिस अधीक्षक मनोज प्रभाकर लोहार व धीरज यशवंत येवले या दोघांना कोर्टाने बुधवारी (ता.16) दोषी ठरविले आहे. तसेच या प्रकरणातील तिसरे आरोपी चाळीसगावचे तत्कालीन पोलिस उपनिरीक्षक विश्वासराव निंबाळकर यांची निर्दोष मुक्तता करण्यात आली आहे.

काय आहे प्रकरण?

चाळीसगाव येथील रहिवासी व जिल्हा परिषदेचे माजी सदस्य डॉ.उत्तमराव धनाजी महाजन यांचे अपहरण करून त्यांच्याकडून 25 लाखांची खंडणी मागितल्याप्रकरणी पोलिस अधिक्षक मनोज लोहार यांच्याविरोधात गुन्हा दाखल करण्‍यात आला होता. मनोज लोहार यांनी डॉ. महाजन यांचे अपहरण करून वेगवेगळ्या दोन ठिकाणी डांबून ठेवले होते. ही घटना 30 जून 2009 रोजी चाळीसगाव येथे घडली होती. दरम्यान, मनोज लोहार यांची जळगाव जिल्ह्यातील कारकिर्द वादग्रस्त ठरली होती.

याप्रकरणी बुधवारी कोर्टाने निकाल दिला. त्यात तत्कालिन अप्पर पोलिस अधीक्षक आणि मुंबई होमगार्डचे पोलिस अधिक्षक मनोज लोहार व धीरज येवले या दोघांना कोर्टाने दोषी ठरवले आहे. येत्या 19 जानेवारीला दोन्ही दोषींना शिक्षा सुनावण्यात येणार आहे.
Police Officer Manoj lohar Found Guilty in Kidnaping and Exstortion Case

Post a Comment

 
Top