0
खेलो इंडियात महाराष्ट्राचा दबदबा कायम; चौथ्या दिवशी पदकतालिकेत अव्वल स्थान राखून ठेवले आहे.

पुणे- राष्ट्रीय विक्रमवीर युवा धावपटू तेजस शिर्सेने शुक्रवारी खेलाे इंडिया यूथ गेम्समध्ये पदकाची कमाई केली. ताे या स्पर्धेत राैप्यपदकाचा मानकरी ठरला. पहिल्यांदाच सहभागी हाेताना त्याने पदकाला गवसणी घालण्याचा पराक्रम गाजवला. त्याने १७ वर्षांखालील मुलांच्या ११० मीटर अडथळा शर्यतीमध्ये दुसरे स्थान गाठले. त्याने १४.४८ सेकंदांत ही शर्यत पूर्ण केली. यासह त्याने २० दिवसांनंतर सलग दुसऱ्या पदकाची कमाई केली. त्याने १९ डिसेंबर राेजी ६४ व्या राष्ट्रीय स्पर्धेत विक्रमासह सुवर्णपदक पटकावले हाेते.

पुण्यातील छत्रपती शिवाजी महाराज क्रीडानगरीत सुरू असलेल्या खेेलो इंडिया स्पर्धेत महाराष्ट्राच्या संघाच्या खेळांडूनी पहिल्या दिवसांपासूनच आपला दबदबा निर्माण केला आहे. शुक्रवारी हीच कामगिरी कायम ठेवत महाराष्ट्राने अॅथलेटिक्स, कुस्ती, स्विमिंगमध्ये चमकदार कामगिरी करत स्पर्धेतील सुवर्ण घोडदौड कायम ठेवली. याच कामगिरीच्या जोरावर महाराष्ट्राने ३२ सुवर्णपदकांसह ९१ पदके पटकावली. यात २४ राैप्य आणि ३५ कांस्यपदकांचा समावेश आहे.

महाराष्ट्र संघातील खेळांडूनी सर्वच क्रीडा प्रकारात चमकदार कामगिरी करत आपले स्पर्धेतील वर्चस्व दाखवून दिले आहे. गुरुवारी महाराष्ट्राच्या संघाने १५ सुवर्णपदकांसह ५६ पदके पटकावत स्पर्धेत आघाडी घेतली होती. शुक्रवारीदेखील सुवर्ण विजयाच्या कामगिरीत सातत्य ठेवत अॅथलेटिकमध्ये २१ वर्षांखालील गटात ११० हडल्समध्ये मुंबईच्या अॅलन नरोनहा, पाच हजार धावण्याच्या स्पर्धेत नाशिकच्या पूनम साेनूने तसेच १७ वर्षांखालील मुलींच्या गटात ४ बाय १०० रिले, अंडर-२१ मुली गटात ४ बाय १०० रिले प्रकारात, तर ४०० मीटरच्या स्पर्धेत अदेश घरसाने ४८.७४ सेकंदांत सुवर्ण पटकावले. याच बरोबरच वेटलिफ्टिंमध्ये रूपा हनगंडीच्या रूपात सुवर्ण, स्विमिंगमध्ये वेदांत बापना व युगा बिरनाळे यांनी सुवर्ण पटकावले.ज्युदो-१७ वर्षांखालील गटात ६३ किलो गट अपूर्वा-सुवर्ण तसेच देव तिलक थापा ६६ किलो गट सुवर्ण पटकावले. जिम्नॅस्टिक-२१ वर्षांखालील गटातील साधन प्रकारांमध्ये एरिक डे याने सुवर्णपदक जिंकले, तर कुस्तीमध्ये वेताळ व महेश यांनी सुवर्ण पटकावले.

प्रांजलीला राैप्यपदक
मुलींमध्ये १७ वर्षांखालील गटात तामिळनाडूच्या थबीथा पी.एम. हिने १४.१४ सेकंदांत अंतर पार करीत सुवर्णपदक मिळवले. महाराष्ट्राच्या प्रांजली पाटील (१४.४९ से.) हिने रौप्यपदकाची कमाई केली. प्रांजली ही मुंबई येथे वीरेंद्र यादव यांच्या मार्गदर्शनाखाली सराव करते.

राष्ट्रीय विक्रमवीर तेजसने पटकावले राैप्यपदक
गत वर्षी राष्ट्रीय स्पर्धेदरम्यान नॅशनल विक्रमाला गवसणी घालणाऱ्या तेजस शिरसेने पुण्यातील खेलाे इंडिया यूथ गेम्समध्येही आपल्या उल्लेखनीय कामगिरीने ठसा उमटवला. त्याने त्याने १७ वर्षांखालील मुलांच्या ११० मीटर अडथळा शर्यतीत राैप्यपदक पटकावले. त्याने १४.४८ सेकंदांमध्ये हे निश्चित अंतर पूर्ण केले. यासह ताे दुसऱ्या स्थानावर राहिला. त्याला गत महिन्यात केलेल्या सर्वाेत्कृष्ट कामगिरीची लय कायम ठेवता आली नाही. त्यामुळेच त्याचे सुवर्णपदक हुकले. त्याने गत महिन्यात १४.३६ सेकंदांत अंतर गाठून विक्रम नाेंदवता अाला. जुलै २०१७ मध्ये त्याने अॅथलेटिक्सला सुरुवात केली. तो सुरेंद्र मोदी यांच्या मार्गदर्शनाखाली सराव करीत आहे. शाळेत पूनम राठोड यांच्याकडून त्याने अॅथलेटिक्स प्रशिक्षण घेतले. हा औरंगाबादजवळील देवगाव रंगारी येथील शेतकऱ्याचा मुलगा आहे. Young runner Tejas Shirse win silver medal in Khelo India Competition

Post a Comment

 
Top