राजकारण : मतदान प्रमाणात महिलांकडे पुरुषांशी बराेबरी साधण्याची संधी
हे नव वर्ष राजकीय व आर्थिकदृष्ट्या विशेष असेल. माेदी सरकारचा कार्यकाळ मेमध्ये संपत आहे. निवडणुकांची घाेषणा मार्चमध्ये हाेऊ शकेल. यंदा लोकसभा निवडणुकीत ९० कोटींपेक्षा जास्त मतदार असतील. दुसरीकडे, देशाची अर्थव्यवस्थाही रुळांवर येत आहे. सध्याचा वेग राहिल्यास यंदा आपण ब्रिटनला मागे टाकत जगातील पाचव्या क्रमांकाची अर्थव्यवस्था बनू शकताे.
राजकारण : मतदान प्रमाणात महिलांकडे पुरुषांशी बराेबरी साधण्याची संधी
२०१९ च्या निवडणुकीत ९० कोटींपेक्षा जास्त मतदार असतील. त्यापैकी ४७ काेटी १८ ते ३५ वर्षे वयोगटातील. सर्वाधिक १४.२५ कोटी (१६.२%) उत्तर प्रदेशातील अाहेत. २०१४ मध्ये ८३.४० कोटी मतदार होते.

- लोकसभा निवडणुकीसोबत आंध्र प्रदेश, जम्मू-काश्मीर, अरुणाचल, ओडिशा व सिक्कीम या राज्यांतही निवडणूक असेल.
- ऑक्टोबर- नोव्हेंबरमध्ये हरियाणा, महाराष्ट्र, झारखंडमध्येही निवडणुका.
- जगातील सर्वात कमी खर्चाची निवडणूक भारतात होते. यंदा ७७०० कोटी खर्च येऊ शकतो. म्हणजेच एका मतासाठी ७७ रुपये.
अर्थव्यवस्था : ब्रिटनला मागे टाकत भारत पाचव्या स्थानी येईल
अर्थव्यवस्थेत सध्या ब्रिटन पाचव्या क्रमांकावर आहे. त्यांची अर्थव्यवस्था २.६२ लाख कोटी डॉलरची असून १.६% विकासदर आहे. या वेगाने ब्रिटन पुढील वर्षी २.६६ लाख कोटी डॉलरवर पोहोचेल. सहाव्या क्रमांकावरील भारताची अर्थव्यवस्था २.५९ लाख कोटी डॉलरची असून ७.४% चा विकासदर आहे. भारत या वेगाने पुढील वर्षी २.८० लाख कोटी डॉलरवर पोहोचून पाचवे स्थान गाठेल. जुलै २०१८ मध्ये फ्रान्सला मागे टाकत सहावे स्थान गाठले होते. तथापि, दरडोई उत्पन्नात भारत १२६व्या स्थानी आहे.

क्रीडा : इंग्लंडमध्ये प्रथमच क्रिकेट विश्वचषक, यंदा
१० संघच सहभागी होतील
- इंग्लंडमध्ये ३० मेपासून क्रिकेट वर्ल्डकप सुरू होईल. यंदा केवळ १० संघच असतील व ग्रुप सिस्टम नसेल. १९९२ नंतर प्रथमच राउंड रॉबिन पद्धत अवलंबली जाईल. म्हणजे सर्व संघांना एकमेकांविरुद्ध सामने खेळावे लागेल. ४६ दिवसांत ४८ सामने होतील.
- चांद्रयान-२ मोहीम : आपले चांद्रयान चंद्रावर उतरेल. यशस्वी झाल्यास चंद्राच्या दक्षिण ध्रुवात लँडर उतरवणारा भारत पहिला देश ठरेल. चीन व इस्रायलही रोव्हर उतरवण्याच्या तयारीत आहे.
- विमानतळावर फेस स्कॅनिंग : देशात हवाई प्रवाशांसाठी डिजी यात्रा सिस्टम लागू होईल. तपासणीसाठी ओळखपत्राची गरज नसेल. फेस स्कॅनिंगनेच ओळख पटवली जाईल. बंगळुरू आणि हैदराबाद विमानतळावरून याची सुरूवात होईल.

१ जानेवारीपासून आपल्या उपयोगाचे चार मोठे बदल
1 मॅग्नेटिक स्ट्रिप कार्ड बंद होऊन चिपचे कार्ड चालणार
मॅग्नेटिक स्ट्रिपचे डेबिट/ क्रेडिट कार्ड बंद होणार. फक्त ईएमव्ही चिप असलेले कार्डच चालणार. सायबर गुन्ह्यांपासून वाचण्यासाठी हे कार्ड सुरू करण्यात येत आहेत.

2 सीटीएस चेकच चालणार, २४ तासांत भरणा होईल
बँका नॉन सीटीएस चेक घेणार नाहीत. सीटीएस (चेक ट्रंकेशन सिस्टिम) चेक चालणार. क्लीअरिंग २४ तासात व व्यवहार सुरक्षित होईल. चेकला स्कॅन करून बनावट चेक बनवणे अवघड.

3 अपघात विमा १५ लाखांपर्यंत मिळणार
अपघातात मृत्यू झाल्यास कुटुंबाला मिळणारा वैयक्तिक अनिवार्य अपघात विमा १ लाखाहून वाढून थेट १५ लाख रुपयांपर्यंत करण्यात आला.

4 एनपीएसमधून ६०% पर्यंत रक्कम काढणे करमुक्त
राष्ट्रीय पेन्शन योजनेअंतर्गत आता ६०% पर्यंत रक्कम काढल्यास कर लागणार नाही. ४०% रक्कम योजनेत जमा ठेवणे गरजेचे.

२५ जानेवारीपर्यंत मतदार यादीत नाव नोंदवण्याची संधी
{१ जानेवारी २०१९ ला १८ वर्षे पूर्ण झालेल्या लोकांना २५ जानेवारीपर्यंत मतदार यादीत नावनोंदणी करण्याची संधी आहे. {३१ मार्चपर्यंत पॅन कार्डला आधारशी लिंक करणे गरजेचे. अन्यथा पॅन रद्द होईल.

Post a Comment