0
5 जानेवारीला रात्री होणार 2019 मधील पहिले सूर्यग्रहण, जपान, उत्तर-दक्षिण कोरिया इ. देशांमध्ये दिसणार, भारतात दिसणार की

वर्ष 2019 मधील पहिले सूर्यग्रहण 5 जानेवारीला रात्री होईल, परंतु हे ग्रहण भारतात दिसणार नाही. यामुळे या ग्रहणाचा भारतात कोणताही प्रभाव मानला जाणार नाही. हे ग्रहण, मध्य-पूर्व चीन, उत्तर-दक्षिण कोरिया, उत्तर-पूर्व रुस, मध्य-पूर्व मंगोलिया, प्रशांत महासागर, अलास्काच्या पश्चिम तटावर दिसेल.


2019 मध्ये एकूण 5 ग्रहण...
- वर्ष 2019 मध्ये एकूण 5 ग्रहण होणार. यामध्ये तीन सूर्यग्रहण आणि 2 चंद्रग्रहण आहेत.
- सर्वात पहिले सूर्यग्रहण 5 जानेवारीला रात्री होईल. हे ग्रहण भारतात दिसणार नाही.
- 21 जानेवारीला चंद्रग्रहण होईल. हेसुद्धा भारतात दिसणार नाही.
- 2 जुलैला खग्रास सूर्यग्रहण होईल. हेसुद्धा भारतात दिसणार नाही.
- 16 जुलैला खंडग्रास चंद्रग्रहण दिसेल. हे ग्रहण भारतात दिसणार.
- वर्ष 2019 मधील शेवटचे सूर्यग्रहण 16 डिसेंबरला होईल. हे ग्रहण फक्त दक्षिण भारतातील काही भागांमध्येच दिसेल.


भारतात दिसणार 2 ग्रहण...
1. 16 जुलैला खंडग्रास चंद्रग्रहण होईल. हे ग्रहण उत्तराषाढा नक्षत्र आणि धनु-मकर राशीवर होईल. ग्रहणाचा स्पर्श 01:32 ला होईल आणि मोक्ष पहाटे 04:30 ला होईल. ग्रहणाचा पर्वकाळ 2 तास 58 मिनिट राहील.


2. वर्ष 2019 मधील शेवटचे सूर्यग्रहण 26 डिसेंबरला होईल. हे खंडग्रास सूर्यग्रहण असेल आणि मूळ नक्षत्र, धनु राशीवर राहील. हे ग्रहण फक्त दक्षिण भारतातील काही भागांमध्येच दिसेल. ज्या ठिकाणी हे ग्रहण दिसेल तेथेच ग्रहणाचे नियम आणि मान्यता प्रभावी राहतील.

Post a Comment

 
Top