0
वर्षभरात 3 सूर्य ग्रहण तर 2 चंद्र ग्रहण

रिलिजन डेस्क. नववर्ष 2019 च्या पहिल्याच महिन्यात एकानंतर एक ग्रहण आहेत. यामध्ये 6 जानेवारी, अमावस्येला सूर्य ग्रहण असणार आहे. तर याच्या 15 दिवसांनंतर पोर्णिमेला चंद्रग्रहण आहे. पण हे भारतात दिसणार नाही आणि भारतात राहणा-या लोकांवरही याचा अशुभ प्रभाव असणार नाही, पण सूर्य ग्रहणाचा प्रभाव चीन, रशिया, जापान, साउथ कोरिया आणि मंगोलियाच्या काही भागांवर असेल. यामुळे या ठिकाणांवर नैसर्गिक आपत्ती आणि देशाच्या सीमांसंबंधीत तणाव वाढेल. तर चंद्र ग्रहण अमेरिका, आफ्रिका आणि यूरोपच्या काही देशांमध्ये दिसेल. या दोन्ही ग्रहणांचा अशुभ प्रभाव भारतात राहणा-यांवर पडणार नाही.

अजून कधी असणार ग्रहण


* सूर्य ग्रहण
- 2 जुलै - 2019 चे दूसरे सूर्य ग्रहणही भारतात दिसणार नाही. हे ग्रहण प्रशांत महासागरावर असेल आणि याचा प्रभाव अफ्रिका महाव्दिपच्या देशांवर राहिल. याचा प्रभाव अर्जेंटीना, बोलिविया, पेरु, ब्राझिल आणि कोलंबियामध्ये राहिल.
- 26 डिसेंबर - 2019 च्या अखेरच्या महिन्यात होणारे हे तिसरे सूर्यग्रहण आशिक/खंडग्रास राहिल. हे भारत आणि सउदी अरबसोबतच इतर देशांमध्ये दिसेल. याचा अशुभ प्रभाव भारतात राहणा-या लोकांवर पडेल.

* चंद्र ग्रहण
- 17 जुलै - खंडग्रास, 2019 मध्ये असणारे दूसरे आणि शेवटचे चंद्र ग्रहण 16 जुलैला लागणार आहे. हे आशिक चंद्र ग्रहण असेल. हे ग्रहण 2 तास 58 मिनिटे असेल. भारतासोबतच आजुबाजूच्या इतर देशांमध्ये हे ग्रहण दिसेल आणि याचा प्रभाव भारतात राहणा-या लोकांवरही पडेल.
happy new year 2019 solar and lunar eclipse in january 2019 dates of grahans in new year 2019 january2019 calender

Post a Comment

 
Top