0
पंतप्रधान मोदी यांचा तामिळनाडूतील भाजप कार्यकर्त्यांशी व्हिडिओ कॉन्फरन्सिंगद्वारे संवाद.

नवी दिल्ली- आगामी लोकसभा निवडणुकीसाठी भाजप तामिळनाडूतील जुन्या मित्रांशी नव्याने आघाडी करण्यासाठी तयार आहे, असे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी म्हटले आहे. राज्यात राष्ट्रीय लोकशाही आघाडीला बळकट करण्याचे संकेत मोदींनी दिले. मोदींनी गुरुवारी व्हिडिओ कॉन्फरन्सिंगद्वारे तामिळनाडूतील पाच जिल्ह्यांतील भाजपच्या बूथस्तरीय कार्यकर्त्यांशी संवाद साधला. दिवंगत पंतप्रधान अटल बिहारी वाजपेयी यांचा नामोल्लेख करून दक्षिण भारतातील सर्वात मोठ्या राज्यात रालोआचा माजी घटक पक्षाला मैत्रीची हाक दिली.

तमिळनाडूत भाजप व अण्णाद्रमुक लवकरच निवडणुकीत एकत्र येऊन त्याबद्दलची घोषणा करतील, असा कयास लावला जात होता. मोदींच्या वक्तव्यामुळे त्याला पुष्टी मिळाली आहे. तसे झाल्यास २० वर्षांत रालोआत सहभागी होण्याची अण्णाद्रमुकची तिसरी वेळ ठरेल. यापूर्वी अण्णाद्रमुक १९९८ ते १९९९ दरम्यान वाजपेयींच्या सरकारमध्ये होते. मात्र नंतर जयललिता यांनी पाठिंबा काढून घेतला होता. त्यामुळे सरकार कोसळले. २००४ मध्ये झालेल्या सार्वत्रिक निवडणुकीत अण्णाद्रमुक राज्यात रालाेआमध्ये सहभागी झाले. मात्र ही आघाडी केवळ दोन वर्षे चालली.

तामिळनाडूत रालोआला २०१४ मध्ये २ जागा
२०१४ च्या लोकसभेत भाजप ६ घटक पक्षांच्या आघाडीसह निवडणुकीत उतरले होते. भाजपला तेव्हा केवळ २ जागा मिळाल्या होत्या.या आघाडीत तेव्हा भाजप, पट्टाली मक्कल कांची (पीएमके) द्रमुक, अण्णाद्रमुक इत्यादी पक्षांचा समावेश होता.दक्षिण भारतात सर्वात जास्त ३९ जागा तमिळनाडूत असून एकट्या अण्णाद्रमुकला ३७ मिळाल्या होत्या. द्रमुक व काँग्रेसला खातेही उघडता आले नव्हते. राज्यात रालोआचा १८.५ टक्के व अण्णाद्रमुकचा ४४.३ टक्का एवढा होता.

अटलजींनी २० वर्षांपूर्वी आघाडीचे राजकारण आणले होते, आम्ही त्याचे अनुसरण करतोय : पंतप्रधान मोदी
दिवंगत पंतप्रधान अटलबिहारी वाजपेयी यांनी १९९० मध्ये अशा प्रकारचे यशस्वी प्रयत्न केले होते. त्याचप्रमाणे भाजपची दारे आताही जुन्या मित्रांसाठी खुली आहेत. वीस वर्षांपूर्वी वाजपेयींनी भारतीय राजकारणात नवीन संस्कृतीला सुरुवात केली. आघाडीचे राजकारणाची ती सुरूवात होती. तिच आम्ही पुढे घेऊन जात आहोत. आघाडीसाठी मैत्रीचा हात पुढे करणे हा काही नाईलाज नाही. यातून आमचा विश्वास दिसून येतो. सहकारी पक्षांना सोबत घेऊन सरकार चालवण्याचा आमचा प्रयत्न आहे. काँग्रेसने मात्र अनेक दशके दलाल पोसले. त्यांचे अड्डे बनवले. दलालांना (मिशेल) भारतात आणले, असा टोला मोदींनी आपल्या संवादातून लगावला. खरी आघाडी ही जनतेशी नाळ जुळवणे होय. ही नाळ बळकट राहिली पाहिजे तरच संपर्क पुढेही कायम राहतील

भाजप राज्यात १९ जागी निवडणूक लढवू इच्छितो
२०१४ मधील रालोआचे घटक पक्ष मरुमलाची द्रविड मुनेत्र कळघम (एमडीएमके), देसिया मुरपोक्कु द्रविड कळघम (द्रमुक) सारखे पक्ष आता स्वतंत्र लढतात. हेच पक्ष आता अण्णाद्रमुकमध्ये रस दाखवू लागले आहेत. भाजपला राज्यात ३९ पैकी २० जागी निवडणूक लढण्याची इच्छा आहे. सोबतच शेजारच्या पुद्दुचेरीची जागाही लढवू इच्छिते. इतर जागा अण्णाद्रमुक व इतर सहकारी पक्षांना देण्याची भाजपची योजना दिसते. अण्णाद्रमुक मात्र भाजपला ५ जागा देऊ इच्छिते.

जयललितांच्या निधनानंतर पक्ष कमकुवत बनले
मूळच्या तामिळनाडूच्या संरक्षणमंत्री निर्मला सीतारमण व अर्थमंत्री अरुण जेटली यांनी अलीकडेच चेन्नईत मुख्यमंत्री पलानीसामी यांच्याशी चर्चा केली होती. २०१४ मध्ये जयललिता यांनी मोदींच्या विरोधात निवडणूक लढवली होती. म्हणूनच भाजपसोबत आघाडी करावी की नाही, त्याचा लाभ काय? असा प्रश्न अण्णाद्रमुकला पडला आहे. हिंदीभाषिक राज्यांत भाजपचा पराभव झाला होता. आघाडी नाइलाजही आहे. कारण जयललिता यांच्या निधनानंतर पक्षात फूट पडून तो कमकुवत बनला.
Narendra Modi's video conference with BJP leaders in Tamil Nadu

Post a Comment

 
Top