0
यावर्षी आपला देश 70 वा प्रजासत्ताक दिन साजरा करणार आहे. भारत १५ ऑगस्ट १९४७ रोजी स्वतंत्र झाला. मात्र देशाच्या राज्य घटनेची अंमलबजावणी २६ जानेवारी १९५० रोजी सुरु झाली. म्हणूनच २६ जानेवारी हा ‘प्रजासत्ताक दिन म्हणून साजरा केला जातो. सध्या जे तिरंग्याचे स्वरुप आहे. पहिले असे नव्हते. आजचा तिरंगा हा सहावा तिरंगा आहे म्हणजेच यामध्ये सहा वेळा बदल करण्यात आले आहे. चाल तर मग जाणून घेऊयात कसा बदलत गेला आपला तिरंगा….

प्रत्येक स्वतंत्र देशाचा स्वतःचा एक ध्वज असतो आहे. आता जो आपला तिरंगा आहे त्याला 22 जुलै 1947 रोजी झालेल्या भारतीय संविधान सभेच्या बैठकीत ठरविण्यात आला होता. ही बैठक 15 ऑगस्ट 1947 रोजी इंग्रजांपासून स्वंतत्र मिळण्याच्या काही दिवस आधीच झाली होती.

पहिला राष्ट्रीय ध्वज: 1906 मध्ये भारताचा अनधिकृत ध्वज
flag1
7 ऑगस्ट 1906 रोजी पारसी बागान चौक (ग्रीन पार्क) कलकत्ता येथे हा तिरंगा फडकविण्यात आला होता. आता त्याला कोलकाता असे म्हटले जाते. हा तिरंगा लाल, पिवळा आणि हिरव्या रंगाच्या समांतर पट्ट्यापासून बनवला होता.

दुसरा राष्ट्रीय ध्वज: 1907 मध्ये भीकाजीकामा तर्फ फडकविण्यात आलाflag2
हा तिरंगाला पॅरिसमध्ये मॅडम कामा आणि 1907ला त्यांच्या सोबत निर्वासित झालेल्या काही क्रांतिका-यांनी फडकविला होता.तिरंग्याच्या वरच्या बाजूला एक कमळ होते, परंतु हे सात तारे सप्तर्षी दर्शवितात. हा ध्वज बर्लिनमधील समाजवादी परिषदेत देखील दाखविण्यात आला.

1917 च्या चळवळीतील तीसरा राष्ट्रीय ध्वजflag3
तिसरा तिरंगा 1917 मध्ये आला जेव्हा राजकीय संघर्ष निर्माण झाला होता . डॉ. अॅनी बेझेंट आणि लोकमान्य टिळक यांनी हा तिरंगा एका आंदोलना दरम्यान फडकविला होता. या ध्वजात 5 लाल आणि 4 हिरव्या समांतर पट्ट्या होत्या आणि एका नंतर एक असे सात तारे होते. एका कोपऱ्यात पांढऱ्या रंगाचा अर्ध-चंद्र आणि एक तारा होता.

चौथा राष्ट्रीय ध्वज: 1921 मध्ये अनधिकृतपणे स्वीकारला गेला होताflag4
1921साली बेंजवाडा (आता विजयवाडा) येथे अखिल भारतीय काँग्रेस कमिटीचे एक सत्र झाले होते. तेव्हा आंध्रप्रदेशातील एका तरुणाने तिरंगा तयार केला आणि गांधीजींना दिला. हा तिरंगा दोन रंगांने बनवण्यात आला होता. लाल आणि हिरवा रंग जे प्रमुख समुदाय म्हणजेच जसे हिंदू आणि मुस्लिम याचे प्रतिनिधित्व करतात.

गांधीजींनी सुचविले की या तिरंगामध्ये देशाचे इतर समुदायाचे प्रतिनिधित्व करण्यासाठी एक सफेद रंगाची पट्टी आणि देशाच्या प्रगती सांगणारा एक चरखा असायला हावा.

पाचवा राष्ट्रीय ध्वज: 1931 मध्ये हा ध्वज भारतीय राष्ट्रीय सैन्याचे लढाईचे प्रतीक होतेflag5
1931 हे साल ध्वजांच्या इतिहासात संस्मरणीय वर्ष ठरणारे आहे. हा तिरंगा आपल्या राष्ट्रीय ध्वज म्हणून स्वीकारण्यासाठी एक ठराव पारित केला गेला. हा तिरंगा सध्याच्या तिरंगाचे आधीचे स्वरुप आहे. हा तिरंगा भगवा, पांढरा, हिरवा आणि मध्यभागी गांधीजींचा चालत असलेला चरखा अशा स्वरुपाचा होता.

सहावा राष्ट्रीय ध्वज: भारताचा सध्याचा तिरंगाflag6
22 जुलै 1947 रोजी संविधान बैठकीत या तिरंग्याला भारतीय राष्ट्रीय ध्वज म्हणून स्वीकारले गेले. तिरंग्यामध्ये चरख्याऐवजी सम्राट अशोकाचे धर्म चक्र दाखविण्यात आले आहे. अशा प्रकारे, काँग्रेस पक्षाचा तिरंगा ध्वज अखेरीस स्वतंत्र भारताचा तिरंगा ध्वज बनला.

Post a Comment

 
Top