तरुणीचे वय सतरा सरलं अन् अठरावं लागल. त्याच्या दुसऱ्याच दिवशी म्हणजे ४ जानेवारी रोजी 'त्या' प्रेमीयुगुलाने घरदार सोडले.
जळगाव- 'प्रेम' हा अडीच अक्षरांचा शब्द... त्यातच सर्वस्व सामावलेय. एकमेकांवर प्रेम जडल्यावर सर्व अडथळे, विरोध पत्करून प्रेमधर्म निभावल्याची लैला-मजनू, हीर-रांझा असे अनेक प्रेमीयुगुल साक्षी आहेतच... त्यांनाच आदर्श मानून जळगावातील दोन प्रेमीयुगुल 'सैराट' झाले. एका प्रेमीयुगुलाने तिचे वय सतरा सरल्यानंतरच धूम ठोकली. योगायोगाने हे दोन्ही प्रेमीयुगुल गुरुवारी एकाच वेळी थेट रामानंदनगर पोलिस ठाण्यात हजर झाले. त्यातल्या एका युवतीने वर्षभरापूर्वीच लग्न केल्याचे ऐकून तिच्या आईची शुद्धच हरपली. चारही युवक- युवतींचे नातेवाईक, वऱ्हाडी मंडळी पोलिस ठाण्यात जमली. त्यानंतर पोलिस ठाण्यात या प्रेमीयुगुलांचा एकच 'लग्नकल्लोळ' उडाला.
जळगाव शहरातील आकांक्षा (नाव बदललेले आहे) या युवतीची चार वर्षांपूर्वी शहरातील पॅपिलॉन हॉटेलमध्ये नांदेड येथील स्वप्निल या युवकाशी नजरेला नजर भिडली. दोघांचाही निशाणा अचूक लागला. प्रेमाच्या आणाभाका घेतल्या. तेव्हापासून त्यांचे 'एक डाल पे तोता मैना' असे सुरू झाले. घरच्यांना आपले प्रेम रुचणार नाही, या कल्पनेने त्यांच्या मनात घर केलं. पळून जाण्याचा विचारही डोकावला; पण तिचं वय अल्लड. दोघांनीही सबुरीने घेतले. त्यानंतर प्रेम काही दिवस बहरतच गेले.
तरुणीचे जसं वय सतरा सरलं अन् अठरावं लागल. त्याच्या दुसऱ्याच दिवशी म्हणजे ४ जानेवारी रोजी 'त्या' प्रेमीयुगुलाने घरदार सोडलं. गुरुवारी सकाळी ते थेट विवाहबंधनात अडकूनच रामानंदनगर पोलिस ठाण्यात आले. हे कळल्यानंतर युवतीची आई लहान मुलासह पोलिस ठाण्यात आली. मुलीने आंतरजातीय विवाह केल्याचे ऐकून सहायक पोलिस निरीक्षक सचिन बेंद्रे यांच्या कार्यालयासमोर पराभूत चेहरा करून बेंचवर बसलेली होती. या वेळी त्यांना शब्दही पारखे झाले होते. बेंद्रे यांनी नवदांपत्याला बोलावून समुपदेशन केले. मुलगा एका भरीत सेंटरमध्ये कामाला असल्याचे कळाल्यानंतर डोक्याला हात मारून घेतला. दारासमोर मांडव टाकून मुलीचे लग्न झालेलं त्यांना बघायचं होतं; पण मुलींने विवाह केल्याने त्यांच्या स्वप्नावर आता पाणी फिरले आहे. याविषयीची हालमेल त्यांच्या चेहऱ्यावर दिसत होती.
आईसाठी तरी चल, भावाची बहिणीला हाक; तरी तरुणींने दिला स्पष्ट नकार
युवतीचा भाऊ व नातेवाईक पोलिस ठाण्यात आले. युवतीच्या भावाने तिला व तिच्या नवऱ्याला पोलिसांसमोरच दम भरला. पोलिसांनी त्याला आवरले. या वेळी चारही युवक- युवतींचे नातेवाईक पोलिस ठाण्यात आलेले होते. शेवटी हतबल होऊन आईसाठी तरी चल, अशी भावनिक साद त्याने बहिणीला घातली. तिच्या नवऱ्यालाही हात जोडून तिला सोड, अशी विनवणी केली. भावाचा कावा ओळखत तिने स्पष्ट नकार दिला. पोलिसांनी दोघांचेही जबाब लिहून घेतले. त्यानंतर दोन्ही नवविवाहितांनी आपल्या जोडीदारासोबतच जाणे पसंत केले. एकंदरित रामानंदनगर पोलिस ठाण्यात दिवसभर हा 'लग्नकल्लोळ' सुरू होता. या प्रकाराची दिवसभर चर्चा होती.
लग्नानंतर तरुणी वर्षभर राहिली आई-भाऊसोबत
मूजे महाविद्यालय परिसरातील युवती मनीषा (नाव बदललेले आहे) हिचे दोन वर्षांपूर्वी मुंबईला एका वृत्तवाहिनीत काम करणाऱ्या मनीष (नाव बदललेले आहे) नावाच्या पत्रकार युवकावर प्रेम जडले. ती मुलगी आई व भावासोबत राहत होती. दोघांच्याही चोरून ती त्याला भेटत होती; परंतु काही दिवसांपूर्वी ती अचानक बेपत्ता झाली. कुटुंबीयांनी पोलिस ठाण्यात हरवल्याबाबत तक्रार दिली. मुलीच्या प्रेमसंबंधाची आईला तसूभरही कल्पना नव्हती. पोलिसांबरोबर कुटुंबीयही तिचा शोध घेत होते. गुरुवारी अचानक ती त्या युवकासोबत कपडे व इतर साहित्य असलेल्या गाठोड्यांसह पोलिस ठाण्यात आली. सर्व हकिकत पोलिसांना कथन केली. मुलीच्या कुटुंबीयांनाही हा प्रकार कळला. पोलिस ठाण्याकडे येण्यासाठी भावासह मुलीची आई निघाली; मात्र, मुलीने वर्षभरापूर्वीच लग्न केल्याचे ऐकून आईची रस्त्यातच शुद्ध हरपली. त्यांना खासगी रुग्णालयात दाखल करण्यात आले.

Post a Comment