0
रेहाना यांनी हिंमत दाखवून स्टेशनवरील लोकांच्या मदतीने आरोपी भूपेंद्र मिश्रा याच्या मुसक्या आवळल्यामुंबई- बॅंक एटीएममध्ये फसवणूक झालेल्या एका महिलेने हिंमत दाखवून आरोपीवर पाळत ठेऊन त्याला पकडून पोलिसांच्या ताब्यात दिले. ही घटना वांद्रे स्टेशनवरील एका एटीएमवर घडली. आरोपीला पकडण्यासाठी महिलेने तब्बल 17 दिवस त्याच्यावर पाळत ठेवली होती. तेव्हा कुठे 4 जानेवारीला महिलेला आरोपीला पकडण्यात यश आले. तिने त्याला पकडून पोलिसांच्या ताब्यात दिले.

18 डिसेंबरला एटीएमवर गेली होती महिला

पोलिसांनी दिलेली माहिती अशी की, रेहाना शेख ही महिला 18 डिसेंबर रोजी पाली हिल्स येथील ऑफिसला जात होत्या. त्यापूर्वी पैसे काढण्यासाठी त्या वांद्रे स्टेशनवरील एटीएममध्ये गेल्या. काही तांत्रिक अडचणीमुळे एटीएममधून पैसे निघाले नाहीत. यादरम्यान, आरोपी भूपेंद्र मिश्रा हा रेहाना शेख यांच्या मदतीसाठी पुढे आला. त्याने रेहाना यांच्या डेबिट कार्डवरील संपूर्ण माहिती क्षणात माहित करून घेतली. नंतर रेहाना ऑफिसला निघून गेल्या. परंतु काही वेळेनंतर 10 हजार रुपये अकाऊंटवरून डेबिट झाल्याचा मेसेज रेहाना यांना मिळाला. फसवणूक झाल्याचे लक्षात आल्यानंतर रेहाना यांनी वांद्रे स्टेशनवरील एटीएम गाठले. परंतु तो पर्यंत आरोपी भूपेंद्र तेथून निघून गेला होता. त्यानंतर रेहाना यांनी ऑफिसला जाता-येताना तब्बल 17 दिवस आरोपीवर पाळत ठेवली.

गेल्या शुक्रवार रेहाना स्टेशन उभ्या होत्या. एटीएमबाहेर आरोपी उभा असल्याचे त्यांनी पाहिले. रेहाना यांनी हिंमत दाखवून स्टेशनवरील लोकांच्या मदतीने आरोपी भूपेंद्र मिश्रा याच्या मुसक्या आवळल्या. त्या पकडून पोलिसांच्या ताब्यात दिले.

एका पोलिस अधिकार्‍याने सांगितले की, भूपेंद्र मिश्रा हा अट्टल गुन्हेगार आहे. त्याच्या विरोधात मुंबईतील विविध पोलिस स्टेशनमध्ये गुन्हे दाखल आहेत. मागील वर्षी जानेवारीमध्ये क्राइम ब्रॅंचने आरोपीला अटक केले होते.Woman catches ATM fraud accused in Mumbai

Post a Comment

 
Top