0
राशीचक्रातील तिसरी राशी आहे मिथुन, या राशीचे लोक जोडीदाराच्या वाईट काळात खंभीरपणे मागे उभे राहतात

ज्या लोकांच्या नावाचे पहिले अक्षर का, की, कू, घ, ड, छ, के, को, ह पासून सुरु होते, त्यांची राशी मिथुन असते. ज्योतिषमध्ये मिथुन राशीचक्रातील तिसरी राशी आहे. राशीचे स्वरूप स्त्री-पुरुष आलिंगनबद्ध असे आहे. उज्जैनचे ज्योतिषाचार्य पं. मनीष शर्मा यांच्यानुसार या राशीचे लोक जोडीदारासाठी नेहमी शक्ती रूपात कायम उभे राहतात. जोडीदाराच्या वाईट काळात प्रत्येक क्षणी सोबत राहतात. कधीकधी घरगुती कारणांमुळे वादही होत राहतात. येथे जाणून घ्या, मिथुन राशीच्या लोकांच्या खास गोष्टी...


मिथुन
नामाक्षर : का, की, कू, घ, ड, छ, के, को, ह
राशीचे स्वरूप - स्त्री-पुरुष आलिंगनबद्ध
राशी स्वामी - बुध
1. राशिचक्रातील ही तिसरी रास. राशीचे चिन्ह तरुण युगुल आहे. ही द्विस्वभावाची रास आहे.
2. मृगाशीर्ष नक्षत्राच्या तिसऱ्या चरणात स्वामी मंगळ.शुक्र आहे. मंगल शक्ती आणि शुक्र माया आहे.
3. रास असलेल्या व्यक्तीच्या मनात प्रेमभावना अधिक असते. जोडीदारासाठी महत्त्वाचा आधार असतो. घरगुती कारणावरून अनेकदा तणाव असतो.
4. मंगळ आणि शुक्राची युती असल्याने स्त्रियांच्या आजाराचे निदान करण्याची अद््भुत क्षमता असते.
5. या राशीच्या व्यक्तींना वाहनांची चांगली माहिती असते. नवनवीन वाहने आणि भौतिक साधानांचे खूप आकर्षण असते. घरगुती सजावटीवर अधिक भर असतो.
6. मंगळामुळे अशी व्यक्ती वचनांची पूर्तता करण्यास कटिबद्ध असते.
7. गुरू आकाशाचा राजा आहे, तर राहू गुरूचा शिष्य. दोघे मिळून या राशीच्या व्यक्तींच्या ईश्वरीय शक्तींना वाढवतात.
8. ब्रह्मांडाविषयी जाणून घेण्याची या लोकांमध्ये क्षमता असते.
9. जर कुंडलीत राहू-शनि एकत्र असतील तर व्यक्तीची शिक्षा आणि शिक्षण वाढते. या लोकांना शिक्षण क्षेत्र, वीज किंवा पेट्रोल, वाहन क्षेत्रामध्ये काम करण्याची इच्छा असते.
10. आखलेल्या रेषेत राहून काम करतात आणि आयुष्यभर लाभ प्राप्त करतात. व्यक्ती सामाजिक आणि धार्मिक कार्यामध्ये व्यस्त राहतो.
11. कुंडलीमध्ये गुरु आणि मंगळ एकत्र असतील तर व्यक्ती स्वतःच्या कार्यक्षेत्रामध्ये उच्चपद प्राप्त करतो.
12. हे लोक स्वतःच्या विचारांमध्ये गुंग असतात. मिथुन राशी पश्चिम दिशेची प्रतिक आहे.राशी स्वामी बुध आहे.
13. या लोकांमध्ये दूरदृष्टी, बहुमुखी प्रतिभा आणि चातुर्याने कार्य करण्याची क्षमता असते.
14. या लोकांना बुद्धीला चालना देणाऱ्या कामामध्ये यश मिळते.
15. हे लोक पत्रकार, लेखक, विविध भासांचे ज्ञान असणारे आणि योजनाकार असतात.Gemini people and nature rashi and nature

Post a Comment

 
Top