देशातील कुठल्याही राज्याच्या तुलनेत महाराष्ट्रात अजुनही पेट्रोलचे दर सर्वाधिक आहेत.
मुंबई / नवी दिल्ली - पेट्रोल आणि डीझेलच्या वाढत्या किंमतींना पुन्हा ब्रेक लागला आहे. सलग 13 दिवसांपासून डीझेलच्या दरांत वाढ सुरूच होती. तर पेट्रोलचे दर सलग 6 दिवसांपासून वाढत होते. या दोन्हीच्या किंमतीत अखेर बुधवारी घट झाल्याचे दिसून आले आहे. मुंबईपासून दिल्लीपर्यंत पेट्रोल आणि डीझेलचे दर सरासरी 15 पैशांनी कमी झाले आहेत. देशभरातील राज्यांपैकी महाराष्ट्रात अजुनही पेट्रोलचे दर सर्वाधिक आहेत.
दिल्लीत पेट्रोलचे दर प्रति लिटर 71.27 रुपये, कोलकात्यात 73.36 रुपये, मुंबईत 76.90 आणि चेन्नईत 73.99 रुपये प्रति लिटर असे आहेत. दिल्ली, कोलकाता, मुंबई आणि चेन्नई या चारही महानगरांमध्ये डीझेलचे दर अनुक्रमे 65.90 रुपये, 67.68 रुपये, 69.01 रुपये आणि 69.62 रुपये प्रति लिटर आहेत. अर्थातच देशातील कुठल्याही राज्यापैकी महाराष्ट्रात पेट्रोलचे दर सर्वाधिक आहेत. तेल कंपन्यांनी मंगळवारी देशभर पेट्रोलचे दर 13 पैशांनी तर डीझेलचे दर 20 पैशांनी वाढवले होते. त्यामध्ये बुधवारी घट दिसून आली आहे.

Post a Comment