गांधी परिवाराने उत्तर देण्याची मागणी,रफालप्रकरणी सर्वोच्च न्यायालयाचा निकाल अमान्य करणारे राहुल गांधी यावर उत्तर देतील?
मुंबई - ऑगस्टा वेस्टलँड हेलिकॉप्टर खरेदीप्रकरणी भ्रष्टाचार झाल्याचे उघडकीस आले असून भारतातील एअरफोर्सचे अधिकारी, भारतीय अधिकारी आणि राजकीय नेत्यांना २२५ कोटी रुपयांच्या लाचेच्या रकमेपाकी १२५ कोटी रुपयांची लाच देण्यात आली असून यात सोनिया गांधी, राहुल गांधी यांची नावे आली आहेत. रफालप्रकरणी सर्वोच्च न्यायालयाचा निकाल अमान्य करणारे राहुल गांधी यावर उत्तर देतील का? असा प्रश्न मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सोमवारी काँग्रेस अध्यक्ष राहुल गांधी यांना केला. तसेच सर्वोच्च न्यायालयाचा निर्णय अमान्य करणाऱ्यांना नेतेपदी राहू नये, असेही मुख्यमंत्री म्हणाले.
ऑगस्ट वेस्टलँड हेलिकॉप्टर खरेदीप्रकरणी अटकेत असलेल्या ख्रिश्चियन मायकेल याने सोनिया गांधी यांचे नाव घेतल्याने काँग्रेस आणि भाजपमध्ये वाक््युद्ध सुरू झाले आहे. काँग्रेसने सरकार ईडीचा राजकीय वापर करत असल्याचा आरोप केला, तर राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांनीही केंद्र सरकार सत्तेचा दुरुपयोग करत असल्याचा आरोप करून सोनिया गांधी यांचे नाव गोवणे हा मोदी सरकारचा कट असल्याचे म्हटले होते.
मुख्यमंत्री म्हणाले, पंतप्रधान, राष्ट्रपती अशा व्हीव्हीआयपींसाठी १२ हेलिकॉप्टर्स घेण्याचा निर्णय १९९९ मध्ये घेण्यात आला. यासाठी तीन कंपन्यांना कंत्राट देण्यात आले. त्यापैकी रशियन कंपनीने माघार घेतली आणि ऑगस्टा वेस्टलँडला ६ हजार फुटांची अट शिथिल करून ४ हजार फुटांवरून हेलिकॉप्टर उडवण्याची परवानगी देत कंत्राट दिले. याबाबत इटलीमध्ये चौकशी झाली असता त्यात दलाली दिल्याचे समोर आले. शेल कंपनीच्या माध्यमातून लाच देण्यात आली. इटलीतील न्यायालयाने दिलेल्या निकालपत्रातील पान क्रमांक १९३ आणि २०४ वर सोनिया गांधी यांचा उल्लेख आहे. ख्रिश्चन मिशेल हा या व्यवहारातील महत्त्वाचा दुवा आहे. मात्र, त्याला भारतात आणताच काँग्रेसने आपले नेते त्याला वकील म्हणून का दिले. सोनिया आणि राहुल यांचा या दलालीत सहभाग नसेल तर त्याने आपल्या वकिलांना सोनियांबाबत विचारल्यावर काय उत्तर देऊ, अशी विचारणा करणारी चिट्ठी का दिली, असा प्रश्नही त्यांनी केला. दरम्यान, नरेंद्र मोदी हे देशासाठी दिवसरात्र काम करत आहेत. त्यामुळे सूर्याकडे बघून थुंकण्याचा प्रयत्न केला तर थुंकी कुठे पडते? अशा शब्दांत मुख्यमंत्र्यांनी शिवसेनेवर टीका केली.
शरद पवार हे काँग्रेसचे वकील
शरद पवार यांनी मोदी सरकार सत्तेचा दुरुपयोग करत असल्याचा आरोप केला आहे. याबाबत मुख्यमंत्री म्हणाले, २००८ च्या कागदपत्रांतून दलालीचे प्रकरण उघडकीस आले असून आम्ही आत्ता सत्तेवर आहोत. आम्ही काही २००८ मध्ये जाऊन कागदपत्रांमध्ये नावे घातली नाहीत. शरद पवारांपुढे आता दुसरा कोणताही मार्ग नसल्याने त्यांना काँग्रेसची वकिलीशिवाय पर्याय नाही. काँग्रेसलाही चांगला वकील मिळाल्याचा टोला मुख्यमंत्र्यांनी लगावला.
शरद पवार यांनी मोदी सरकार सत्तेचा दुरुपयोग करत असल्याचा आरोप केला आहे. याबाबत मुख्यमंत्री म्हणाले, २००८ च्या कागदपत्रांतून दलालीचे प्रकरण उघडकीस आले असून आम्ही आत्ता सत्तेवर आहोत. आम्ही काही २००८ मध्ये जाऊन कागदपत्रांमध्ये नावे घातली नाहीत. शरद पवारांपुढे आता दुसरा कोणताही मार्ग नसल्याने त्यांना काँग्रेसची वकिलीशिवाय पर्याय नाही. काँग्रेसलाही चांगला वकील मिळाल्याचा टोला मुख्यमंत्र्यांनी लगावला.

Post a Comment