0
बालेवाडीमध्ये भरला युवा खेळाडूंचा कुंभमेळा

पुणे- चांगला खेळ करत आपल्या राज्यासाठी पदक मिळवण्याची जिद्द...त्यासाठी गेल्या कित्येक महिन्यांचा केलेला सराव...अन् हजारो किलाेमीटरचा प्रवास करत देशभरातून दा़खल झालेल्या युवा खेळाडूंच्या रूपातून जणू पुण्यातील बालेवाडीच्या क्रीडा नगरीला युवा खेळाडूंच्या कुंभमेळ्याचेच स्वरूप प्राप्त झाले. कुंभरूपी भरलेल्या या खेळनगरीत पुढील ११ दिवस विविध प्रकारच्या १८ खेळांमध्ये तब्बल ६५०० अधिक खेळाडू पदकासाठी मैदानात उतरणार आहेत.

देशातील युवा खेळाडूंना व्यासपीठ मिळावे तसेच २०२० ऑलिम्पिकच्या तयारीच्या दृष्टीने केंद्र सरकार व राज्य शासनाच्या वतीने पुण्यातील बालेवाडी येथील शिवछत्रपती क्रीडानगरीत खेलो इंडिया या स्पर्धेचे आयोजन करण्यात आले आहे. गेल्या दोन दिवसांपासून सुरू असलेल्या या स्पर्धेचे औपचारिक उद्घाटन बुधवारी दि. ९ करण्यात आले आहे. मेघालय, पश्चिम बंगाल, ओडिशा, पुद्दुचेरी, आसाम, तेलंगण आणि हरियाणा यासह देशभरातील ३६ राज्यांच्या संघांचे खेळाडू, प्रशिक्षक, अधिकारी, कर्मचारी, पालक पुण्यातील शिवछत्रपती क्रीडानगरीत दाखल झाले आहेत. विशेष म्हणजे हजारो किलाेमीटरचा प्रवास केल्यानंतरही खेळाडू या स्पर्धेत उत्साहात सहभागी होत पदक पटकावण्याच्या दृष्टीने खेळाडूंनी आपल्या सरावाला सुरुवात देखील केली आहे. स्पर्धेसाठी आलेल्या विविध राज्यातील आलेल्या खेळाडूंच्या माध्यमातून विविधतेत एकात्मतेचे रूप खेलाे इंडियाचा माध्यमातून या ठिकाणी असलेले प्रत्येक जण अनुभवत आहे.Khelo India: 6500 players will compete for the medal in 18 different sports

Post a comment

 
Top