0
ज्या मुलांचे आई वडील व्यसनी किंवा ड्रग्ज घेत असतील किंवा जी मुले गरीब कुटुंबातील असतील त्यांना लॉरा शिकार बनवायची.

महिला या एका कुटुंबामध्ये किंवा समाजामध्ये विविध प्रकारच्या भूमिका निभावत असतात. पण एखादी महिला तिच्या वासनेसाठी लहान मुलांचे शोषण करते असे सांगितले तर कोणालाही खरे वाटणार नाही. पण अमेरिकेतील एका महिलेने तब्बल 100 मुलांना तिच्या वासनेचे शिकार बनवले असल्याचे समोर आले आहे. ही महिला सध्या तिच्या या गुन्ह्यासाठी तुरुंगात शिक्षा भोगत आहे.


>> 55 वर्षांच्या या महिलेचे नाव आहे लॉरा फे मॅक्कुलम असे आहे.
>> लॉरावर सर्वात आधी 1995 मध्ये फर्स्ट डिग्री चाइल्ड रेप प्रकरमी पिअर्स कौंटी येथे खटला चालवण्यात आला.
>> या गुन्ह्यासाठी तिला वॉशिंग्टनच्या स्पेशल कमिटमेंट सेंटरमध्ये ठेवण्यात आले.
>> तिचे निर्घृण कृत्य पाहता जजने तिला कमिटमेंट सेंटरमधून बाहेर काढण्याची परवानगीही दिली नाही.
>> लॉराला सर्वात आधी 18 वर्षांच्या एका तरुणीवर बलात्कार आणि नंतर तिची हत्या करण्याच्या प्रयत्नामुळे 1990 मध्ये अटक करण्यात आली.
>> याप्रकरणाच्या चौकशीदरम्यान लॉराने पोलिसांना सांगितले की तिने 15 मुलांचे लैंगिक शोषण केले आहे. त्यानंतर तिने तब्बल 100 मुलांवर अत्याचार केल्याचे सांगितले.
>> लॉराने अत्याचार केलेल्यांमध्ये अनेक मुलींचाही समावेश आहे.
>> लॉराला स्वतःची 4 मुले आहेत त्यांचेही लैंगिक शोषण केल्याचा आरोप तिच्यावर आहे.
>> लॉरा मुलांची केअरटेकर म्हणून काम करत होती.
>> ती जेव्हा मुलांना अंघोळ घालायची किंवा त्यांचे कपडे बदलायची तेव्हा त्यांचे लैंगिक शोषण करायची.
>> ज्या मुलांचे आई वडील व्यसनी किंवा ड्रग्ज घेत असतील किंवा जी मुले गरीब कुटुंबातील असतील त्यांना लॉरा शिकार बनवायची.
>> याच चौकशीत लॉराने सांगितले होते की ती 7 वर्षांची असताना तिच्या आजोबांनीच तिच्यावर बलात्कार केला होता.

Women who sexually abused more than 100 children 

Post a Comment

 
Top