0

टीव्ही पाहणाऱ्यांचा पुढील महिन्यापासून खर्च काहीसा कमी होणार आहे

नवी दिल्ली- टीव्ही पाहणाऱ्यांचा पुढील महिन्यापासून खर्च काहीसा कमी होणार आहे. टेलिकॉम रेग्युलेटरी अथॉरिटी ऑफ इंडिया(TRAI)च्या आदेशामुळे आता प्रेक्षकांना 153 रुपये(जीएसटी सहित) प्रति महिन्याला खर्च करून 100 पेड चॅनल्स आणि इतर मोफत चॅनल्स पाहता येणार आहेत. TRAIनं ग्राहकांना 31 जानेवारीपूर्वीच संबंधित 100 चॅनल्स निवडण्यास सांगितलं असून, नवी यंत्रणा 1 फेब्रुवारीपासून लागू होणार आहे. ग्राहकांना मोबाईलवर एसएमएस पाठवून याची माहिती दिली जातेय. TRAIनं जारी केलेल्या दोन टेलिफोन नंबर आणि ईमेल आयडीच्या माध्यमातूनही आपल्याला यासंदर्भात माहिती मिळू शकते. TRAIच्या माहितीनुसार, बेसिक पॅकमध्ये HD चॅनल्सचा समावेश नाही. एखादा HD चॅनल्स हा दोन SD चॅनल्सच्या किमतीच्या बरोबरीचा असेल. 

या नंबरवर करा कॉल
ग्राहक 011-23237922 (ए.के. भारद्वाज) आणि 011-23220209 (अरविंद कुमार) या नंबरवर कॉल करून किंवा advbcs-2@trai.gov.in या arvind@gove.in या ईमेल आयडीवर मेल करून तुम्ही अधिक माहिती मिळवू शकता. 

चॅनल्ससाठी मोजावे लागणार 0-19 रुपये 
दुसरीकडे TRAIने सर्व केबल आणि DTH ऑपरेटर्सना 1 फेब्रुवारीपासून नवी सिस्टीम लागू करण्याचे आदेश दिले आहेत. त्यामुळे ग्राहकांना जे चॅनल्स पाहायचे आहेत, त्या चॅनल्ससाठीच फक्त पैसे मोजावे लागणार आहेत. एका चॅनल्ससाठी 0 ते जास्तीत जास्त 19 रुपये मोजावे लागणार आहेत. चॅनल्स वेगवेगळ्या स्वरूपातही आपण निवडू शकता. नवी यंत्रणा सुरुवातीला 29 डिसेंबर 2018 रोजी लागू होणार होती. परंतु त्यांनी डेडलाइन वाढवून 1 फेब्रुवारी 2019 करण्यात आली आहे. 

समजून घ्या गणित 

केबल ऑपरेटर सरासरी 200 रुपये आकारतात. यामध्ये ते 350 टीव्ही चॅनेल्स दाखविण्याचा दावा करतात. मात्र, यापैकी आपल्या घरामध्ये 10 ते 15 चॅनेलच पाहिले जातात. तसेच डीटीएच ऑपरेटरचे आहे. त्यांनी ठरवलेले पॅकेज असे असते की त्यामध्ये पसंतीचे सर्व चॅनेल मिळत नाहीत. यामुळे त्या चॅनलसाठी नवीन अॅड ऑन चॅनल किंवा पॅक घ्यावे लागते. हा अतिरिक्त खर्च आता बंद होणार आहे. 
नव्या नियमांनुसार केबल किंवा डीटीएच पुरवठादारांकडून आपल्याला हवे असलेले चॅनेल निवडता येणार आहेत. सध्या एखादा स्पोर्टचा चॅनेल घ्यायचा झाल्यास महिन्याला 40 ते 50 रुपये मोजावे लागतात. मात्र, हाच चॅनेल 1 ते 19 रुपयांमध्ये उपलब्ध होणार आहे. महत्वाचे म्हणजे यापुढे कंपन्या सांगतिल ते चॅनेल नाहीत, तर आपल्याला हवेत तेच चॅनेल घेता येणार आहेत. म्हणजेच ग्राहक राजा असणार आहे. 
 
ट्रायने चॅनेलची लिस्ट किंमतीसह दिली...

Post a comment

 
Top