0
असे म्हटले जाते, वडिल हे त्यांच्या मुलींचे पहिले मित्र असतात. वडिल मुलींसाठी आदर्श असतात. वडिल-मुलीच्या या सुंदर नात्याला डेडिकेट करणारे गाणे बॉलिवूडचा प्रसिध्द गायक शानने गायले आहे. शान यांनी गायलेले ‘नो स्मोकिंग पापा’ हे सुंदर गाणे १ जानेवारी, २०१९ ला लॉन्‍च होणार आहे.

‘नो स्मोकिंग पापा’ हे गाणे प्रितीश कामतने लिहिले आहे. शानने गायलेल्या या गाण्याला मितेश-प्रितेशने संगीतबध्द केलेले आहे. याचा टीझर नुकताच लॉन्‍च झाला आहे.

आपल्या गाण्याविषयी शान सांगतात, "मी नुकतेच हे गाणे पाहिले. हे गाणे जेवढे सुरेल झाले आहे. तेवढाच याचा व्हिडिओही मस्त झाला आहे. जेव्हा एखाद्या चांगल्या गाण्याचा तेवढाच सुंदर व्हिडिओ होतो, तेव्हा ते गाणे ऐकणे आणि पाहणेही खूप मजेदार असते. ह्या गाण्याच्या शेवटी एक छान ट्विस्ट आहे. जो मला अत्यंत आवडलाय. गाण्याचा टीझर नुकताच लॉन्‍च झालाय. मला खूप चांगला प्रतिसाद मिळतोय. आणि मला पूर्ण विश्वास आहे, की जेव्हा हे गाणे रिलीज होईल, तेव्‍हा हे लोकांच्या पसंतीस उतरेल.

Post a Comment

 
Top