0

Jules Maria च्या फेसबूक पेजवर हा व्हिडिओ शेअर करण्यात आला.

इंटरनॅशनल डेस्क - सोशल मीडियावर सध्या एका लेकीचा आपल्या वडिलांसोबत डान्सचा व्हिडिओ व्हायरल होत आहे. सुरुवातीला पाहिल्या व्हिडिओमध्ये ती फक्त वडिलांसोबत डान्स करताना दिसून येते. पण, लक्षपूर्वक पाहिल्यास खरे कारण समोर आले. ती फक्त डान्स स्टेप्स करत नव्हती. ती आपल्या वडिलांना रॉक कॉन्सर्टमध्ये सुरू असलेल्या गाण्याचे बोल इशाऱ्यांमध्ये, हातवारे करून समजावून सांगत होती. तिच्या वडिलांना ऐकू येत नाही. तरीही गाण्याचे प्रत्येक शब्द ती साइन लँग्वेजमध्ये त्यांना समजावून सांगत होती. तिचे हातवारे आणि त्या शब्दांच्या बीट्सवर वडील डान्स करत होते आणि ती सुद्धा त्यांची साथ देत होती. 13 डिसेंबर रोजी Jules Maria च्या फेसबूक पेजवर हा व्हिडिओ शेअर करण्यात आला. आतापर्यंत तो व्हिडिओ जवळपास 2.6 कोटी लोकांनी पाहिला आणि 3 लाखांहून अधिक लोकांनी शेअर देखील केला.

Post a Comment

 
Top