सुसाइड नोटमध्ये आपण निर्दोष होतो असे त्यांनी लिहिले आहे.
नोएडा - आयटी कंपनी जेनपॅक्टचे अॅसिस्टंट व्हाइस प्रेसिडेंट (AVP) स्वरूप राज (35) यांनी आत्महत्या केल्याचा खुलासा झाला आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, त्यांच्यावर लैंगिक शोषणाचे आरोप लागले होते. याच प्रकरणात चौकशी सुरू असताना त्यांना निलंबितही करण्यात आले होते. #MeToo कॅम्पेन अंतर्गत सोशल मीडियावर महिला व्यक्त होत असताना कार्यालयातील दोन महिलांनी स्वरुप राज यांच्यावर लैंगिक शोषणाचे आरोप लावले होते. त्यांनी आपल्या सुसाइड नोटमध्ये आपल्यावर लावलेले आरोप खोटे असल्याचे म्हटले आहे. तरीही कंपनी व्यवस्थापनाने मला सहकार्य केले नाही. एक दिवस निर्दोष सिद्ध होणारच आहे. पण, निर्दोष ठरल्यानंतरही लोक मला शंकेने पाहतील. ते मी सहन करू शकणार नाही.
2 वर्षांपूर्वीच झाला विवाह
लिंक्ड-इन प्रोफाइलवर दिलेल्या माहितीनुसार, स्वरूपने 2007 मध्ये प्रोसेस डेव्हलपरच्या पदावर जेनपॅक्ट कंपनीत आपल्या करिअरला सुरुवात केली. याच वर्षी सप्टेंबर महिन्यात त्यांना बढती देण्यात आली. तसेच ते कंपनीचे AVP बनले होते. मूळचे गुरुग्राम येथील रहिवासी राहिलेले स्वरूप राज नोएडाच्या सेक्टर-137 मध्ये पॅरामाउंट फ्लोअर विले सोसाइटीत राहत होते. दोन वर्षांपूर्वीच त्यांचा विवाह झाला होता. स्वरूप यांची पत्नी एका खासगी कंपनीत नोकरी करत आहे. त्याच घरात मंगळवारी रात्री 11.30 वाजता त्यांचा मृतदेह पंख्याला लटकलेल्या अवस्थेत सापडला.

Post a Comment