0
Royal Enfield च्या 650 ट्वीन मोटरसायकल लाँचिंगनंतर घेतला निर्णय

नवी दिल्ली : अमेरिकन कंपनी Harley Davidson ने भारतीय बाजारपेठेत 2014 मध्ये आपली सर्वांत स्वस्त बाइक Harley Davidson 750 लाँच केली होती. त्यावेळी या बाइकची किंमत 4.1 लाख रूपये होती. कंपनीने बाइक लाँचिंगच्या 5 वर्षांनंतर बाइकच्या किमतीत सव्वा लाख रूपयांची वाढ करत बाइकची किंमत 5.31 लाख रूपये केली. पण आता हार्ले डेविडसनला आपल्या मोटारसायकलची विक्री वाढविण्यासाठी 1 लाख रुपयांचा डिस्काउंट द्यावा लागत आहे. Royal Enfield च्या 650 Twin या बाइकच्या लाँचिंगनंतर हार्ले डेविडसनला हा निर्णय घ्यावा लागला.


किंमत आणि फीचरच्या बाबतीत हार्ले डेविडसनला मिळाली जोरदार टक्कर 
नुकत्याच लाँच झालेल्या रॉयल इनफील्डच्या 650 ट्वीन बाइकने कमी किंमत आणि जास्त फीचर सोबत हार्ले डेविडसनच्या स्ट्रीट 750 ला जोरदार टक्कर दिली आहे. यामध्ये हार्लेच्या बाइकच्या तुलनेत चांगले टायर आणि ब्रेकिंग सिस्टम दिले आहेत. Harley Davidson 750 किंमत 5.31 लाख तर याच कॅटेगिरीची Royal Enfield 650 Twin बाइकची किमत फक्त 2.34 लाख रूपये आहे.comparison between Harley Davidson or Royal Enfield

Post a comment

 
Top