0
नवी दिल्ली - अमेरिकेतील एक महिला अवघ्या काही मिनिटातच मेहनत न करता कोट्याधीश बनली आहे. ही महिला भाजी घेण्यासाठी घरातून बाहेर पडली होती. पण नशीबाला वेगळंच काही मान्य होत. कारण बाजारातून घरी येईपर्यंत ती कोट्याधीश होती. वनेसा वार्ड असे या महिलेचे नाव आहे. महिला घराजवळील एका भाजी मार्केटमध्ये भाजी खरेदी करण्यासाठी गेली होती. तिथे तिने स्क्रॅच लॉटरी खरेदी करण्याचे मन बनवले आणि भाजी घेतल्यावर लॉटरीचे एक स्क्रॅच तिकीट खरेदी केले. घरी पोहोचल्यानंतर वनेसाने तिकीटाला स्क्रॅच केल्यानंतर त्यामध्ये तिला टॉप प्राइज मिळाले होते. या लॉटरीची किंमत ऐकून तिला धक्काच बसला. कारण स्क्रॅच लॉटरीमध्ये तिने तब्बल 1.58 कोटी रूपये जिंकले होते.स्वतःचे स्वप्न पूर्ण करणार

वनेसा या रकमेद्वारे आपले स्वप्न पूर्ण करणार आहे. वनेसाने सांगितले की, ती या पैशाला ती तिच्या भविष्यासाठी खर्च करणारा आहे. सोबतच तिचे डिज्नी लँन फिरण्याचे स्वप्न पूर्ण करणार आहे. वनेसा प्रमाणेच यावर्षी केरळच्या प्रबीन थॉमस या व्यवसायिकाचे नशीब एका रात्रीत बदलले होते. थॉमसने दुबईमध्ये एक लॉटरीचे तिकीट खरेदी केले होते. त्यावेळी त्यांना याची कल्पना नव्हती की, त्यांचे नशीब बदलणार असून त्यांच्यावर लक्ष्मीची कृपा होणार आहे. कारण प्रबीन थॉमस यांनी दुबई इंटरनॅशनल एअरपोर्टवर ड्यूटी फ्री ड्रॉ मार्फत 1 मिलियन डॉलर म्हणजेच तब्बल 6,64,20,000 रूपये जिंकले होते.This women become a millionaire in just a few minutes

Post a comment

 
Top