0
एन्टटेन्मेंट डेस्क. बॉलिवूडमध्ये असे अनेक सेलिब्रिटी आहेत, ज्यांच्या आई अनेकदा इव्हेंट्समध्ये त्यांच्याबरोबर दिसत असतात. पण अनेक सेलिब्रिटी असेही आहेत ज्यांच्या आई लाईमलाइटपासून दूर राहणेच पसंत करतात. त्यापैकीच एक आहे कतरिनाची आई. कतरिनाची आई सुझैन ब्रिटीश वंशाची आहे आणि ती चॅरिटीचे काम करत होती. कतरिनाच्या आई वडिलांमध्ये घटस्फोट झालेला आहे. तिची आई सध्या भारतातच राहते. कॅटला आईबरोबर वेळ घालवायला आवडतो. कतरिनाचा आगामी चित्रपट 'झिरो' हा 21 डिसेंबरला रिलीज होत आहे. चित्रपटात ती शाहरुख खानसोबत स्क्रीनवर दिसणार आहे. कैफसोबतच ऐश्वर्या राय, कंगना रनोट, माधुरी दीक्षितसोबतच अनेक अभिनेत्रींच्या आई लाइमलाइटपासून दूर राहतात...

गरीब मुलांना शिकवते कतरिनाची आई
कतरिनाची आई दिर्घकाळापासून भारतात राहते. त्या येथे चॅरिटीचे काम करतात. गरीब मुलांना शिकवतात. कतरिनाला आईसोबत वेळ घालवायला आवडतो. कतरिनाने आपल्या आईच्या चॅरिटेबल ट्रस्टसाठी 5 कोटी रुपये दिले होते. काही वर्षांपुर्वी कतरिना एका मुलाखतीत म्हणाली होती की, ती लहान असताना तिच्या वडिलांनी आईला घटस्फोट दिला होता आणि यानंतर आईने एकटीने आम्हा भावंडांना मोठे केले. ती म्हणाली होती की, माझ्या आयुष्यात वडिलांसाठी काहीच स्थान नाही, माझी आई माझ्यासाठी सर्व काही आहे.

ऐश्वर्याची आई हाउस वाइफ
ऐश्वर्या रायच्या आई वृंदा राय हाउस वाइफ आहेत. एकदा ऐश्वर्या मुलाखतीत म्हणाली होती की, आईने तिला फॅमिली व्हॅल्यूज कशा सांभाळाव्या याविषयी शिकवले.

Post a comment

 
Top