0
सान्या - चीनच्या सान्या शहरात सलग दुसऱ्यांदा पार पडलेल्या मिस वर्ल्ड स्पर्धेचा समारोप झाला. यात मिस इंडिया अनुकृती वासचे मिस विश्व सुंदरी होण्याचे स्वप्न भंगले. अनुकृती 30 सुंदरींच्या यादीतही सामिल झाली. परंतु, शेवटच्या 12 स्पर्धकांमध्ये ती आपली जागा बनवू शकली नाही. मेक्सिकोची व्हॅनिसा पोन्स डी लियोन 2018 ची मिस वर्ल्ड ठरली आहे. तिला गतवर्षी मिस वर्ल्ड राहिलेली भारताची मनुषी छिल्लर हिने क्राउन घातला. उल्लेखनीय बाब म्हणजे, मानुषी छिल्लरने 17 वर्षांच्या खंडानंतर (2017 मध्ये) भारताला मिस वर्ल्डचा खिताब मिळवून दिला.  

कोण आहे अनुकृती वास?
अनुकृती मूळची तामिळनाडूच्या तिरुचिरापल्ली येथील रहिवासी आहे. मिस वर्ल्डच्या ग्रुप 12 च्या शेवटच्या यादीत जागा करू शकली नाही. तिला 30 व्या क्रमांकावर समाधान मानावे लागले. फ्रेंच भाषेत बीए केलेल्या अनुकृतीने ट्रांसलेटर व्हावे अशी तिच्या आईची इच्छा होती. अनुकृतीचे वय 19 वर्षे आहे. ती चेन्नई येथील लोयोला कॉलेजची विद्यार्थिनी आहे. ती एका एनजीओसाठी देखील काम करते. ट्रांसजेंडरला मदत करणे हे या एनजीओचे काम आहे. वासने काही दिवसांपूर्वीच एका मुलाखतीमध्ये सांगितले होते, की तिची एक मैत्रीण ट्रांसजेंडर आहे. तिच्या कुटुंबियांनी तिला सोडले आहे. त्यामुळेच, आपण या एनजीओसाठी काम करत आहोत. विशेष म्हणजे, एक मॉडेल आणि मिस इंडिया वर्ल्डसोबतच अनुकृती एक राज्य स्तरीय खेळाडू सुद्धा आहे.

भारताला सातव्यांदा खिताब मिळण्याची होती संधी
अनुकृतीला 2018 च्या मिस वर्ल्डचा खिताब मिळाला असता तर भारताने हा बहुमान मिळवल्याची ही सातवी वेळ ठरली असती. यापूर्वी अनुक्रमे रीता फारिया, ऐश्वर्या राय, डायना हेडन, युक्ता मुखी, प्रियांका चोप्रा आणि मानुषी छिल्लर यांनी मिस वर्ल्डचा खिताब मिळवला आहे.India missed Miss World 2018 Tittle after Mexican girl Wins, All you need to know about Anukreethy Vas

Post a comment

 
Top