भारतीय जवानांनी त्यास चोख प्रत्युत्तर देत दो घुसखोरांना ठार मारले.
नॅशनल डेस्क - भारतीय लष्कराने नौगाम सेक्टरमध्ये नियंत्रण रेषावर (एलओसी) पाकिस्तानच्या बॉर्डर अॅक्शन टीमच्या घुसखोरीचा कट उधळून लावला आहे. ही घटना रविवारी सकाळी घडली. पाकिस्तानच्या बॅट टीमचे सदस्य आर्मीच्या पोशाखात एलओसीला लागून असलेल्या घनादाट जंगलाचा गैरफायदा घेत घुसखोरी करत होते. या दरम्यान पाकिस्तानी पोस्टवरून तेथील सैनिक भारताच्या दिशेने फायरिंग करताना त्यांना कव्हर दिले जात होते. परंतु, एलओसीवर तैनात भारतीय जवानांनी त्यास चोख प्रत्युत्तर देत दो घुसखोरांना ठार मारले.
भारतीय लष्कराच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांनी दिलेल्या माहितीनुसार, ठार झालेले घुसखोर पाकिस्तानी आर्मीच्या युनिफॉर्ममध्ये होते. त्यांच्याकडून जप्त करण्यात आलेले साहित्य सुद्धा पाकिस्तानी लष्कराचे आहेत. सोबतच, काही घुसखोर बीएसएफ आणि इंडियन एअरफोर्सच्या पोशाखात सुद्धा दिसून आले. घुसखोरांची तयारी पाहता त्यांनी नवीन वर्षाच्या पार्श्वभूमीवर भारतात मोठा दहशतवादी हल्ला करण्याचा कट रचला होता असे दिसून येत आहे. दरम्यान, घुसखोरांचे मृतदेह परत पाठवण्यासाठी पाकिस्तानशी संपर्क साधला जाईल असेही अधिकाऱ्यांनी स्पष्ट केले आहे. घुसखोरांचा खात्मा झाल्यानंतर उर्वरीत टीमचा शोध घेण्यासाठी सैनिकांनी जवळपासच्या परिसरात शोध मोहिम सुद्धा राबवली. त्याच दरम्यान दोघांचे मृतदेह ताब्यात घेतले. त्यांच्याकडे मोठ्या प्रमाणात स्फोटके आणि युद्ध सामुग्री होती.

Post a Comment