नॅशनल डेस्क - रिटायर्ड लेफ्टंनंट जनरल डीएस हुड्डा यांनी सर्जिकल स्टाइकवर खळबळजनक विधान केले आहे. पाकिस्तान आणि तेथील दहशतवाद्यांना धडा शिकवण्यासाठी भारताने सप्टेंबरमध्ये 2016 मध्ये सर्जिकल स्ट्राइक केला होता. हा हल्ला आवश्यक होता. परंतु, त्याची एवढी प्रसिद्धी करण्याची काहीही गरज नव्हती. सर्जिकल स्ट्राइकला गरजेपेक्षा जास्त प्रसिद्ध देण्यात आली आहे असे हुड्डा म्हणाले. हुड्डा स्वतः सर्जिकल स्ट्राइकचा भाग होते. उल्लेखनीय बाब म्हणजे, 2016 मध्ये झालेल्या या लष्करी मोहिमेनंतर भाजप आणि काँग्रेसमध्ये राजकारण सुरू आहे.
लष्करी मोहिम आवश्यक होती...
हुड्डा म्हणाले, सर्जिकल स्ट्राइकला गरजेपेक्षा खूप अधिक महत्व दिले जात आहे. अशा प्रकारची लष्करी मोहिम आवश्यक होती यात दुमत नाही. आता या मोहिमेचे जे राजकारण केले जात आहे ते कितपत योग्य आहे ते राजकीय पक्षांनाच विचारायला हवे. एलओसीवर ज्या घडामोडी होत आहेत, त्यावरून अप्रत्यक्षरित्या उत्तर द्यायला हवे. पाकिस्तान आपल्या देशातून भारतात होणाऱ्या घुसखोरी रोखण्यासाठी काहीही करत नाही. लेफ्टनंट जनरल हुड्डा (रिटायर्ड) सर्जिकल स्ट्राइक सुरू असताना त्याचे लाइव्ह टेलिकास्ट पाहत होते.
काय म्हणाले लष्करप्रमुख
लेफ्टनंट जनरल (रिटायर्ड) हुड्डा यांच्या विधानावर लष्करप्रमुख जनरल बिपीन रावत यांची प्रतिक्रिया समोर आली आहे. त्यांच्या मते, 'त्यांनी (हुड्डा) जे काही म्हटले आहे, ते त्यांचे वैयक्तिक मत असू शकते. मी याविषयी काही बोलू इच्छित नाही. अशा प्रकारच्या (सर्जिकल स्ट्राइक) अनेक लष्करी मोहिमांमध्ये त्यांचीही भूमिका होती. मी त्यांनी म्हटलेल्या प्रत्येक शब्दाचा सन्मान करतो.'

Post a Comment