- बीड- माजलगाव येथील उपविभागीय पोलिस अधिकारी पदाचा पदभार असलेल्या सहायक पोलिस अधीक्षक भाग्यश्री नवटाके यांनी एका समाजाविषयी केलेले वादग्रस्त वक्तव्य त्यांना भोवले आहे. या वक्तव्याची व्हिडीओ क्लिप व्हायरल झाल्यानंतर सोमवारी नवटाकेंची तडकाफडकी बदली करण्यात आली. माजलगावहून त्यांची औरंगाबादच्या राज्य गुप्तचर विभागात (एसआयडी) बदली करण्यात आल्याचे आदेश मिळाले.आयपीएस अधिकारी असलेल्या भाग्यश्री नवटाके यांच्याकडे माजलगाव येथील उपविभागीय पोलिस अधिकारी पदाचा पदभार मागील दीड वर्षांपासून होता. दरम्यान,आपल्या कार्यशैलीमुळे लेडी सिंघम म्हणून त्यांनी ओळख मिळवली होती. मात्र, एका समाजाविषयी आक्षेपार्ह वक्तव्य केल्याची त्यांची एक व्हिडीओ क्लिप तीन दिवसांपूर्वी समाजमाध्यमांवर व्हायरल झाली होती. यानंतर बहुजन विकास मोर्चाचे बाबुराव पोटभरे यांनी या प्रकरणी पोलिस महासंचालकांकडे तक्रार केली होती. अॅट्रॉसिटीनुसार गुन्हा नोंद करण्याची मागणी केली होती. दोन दिवसांत राज्यभरात ही क्लिप पोहचली आणि राज्यभरातून नवटाके यांच्या वक्तव्यावरुन त्यांच्यावर टीकेची झोड उठली होती. मुख्यमंत्र्यांपर्यंत हा विषय पोहोचला होता तर पोलिस महासंचालकांनी नाराजी व्यक्त केली होती. दुसरीकडे पोलिस अधीक्षक जी. श्रीधर यांनीही या क्लिप प्रकरणाच्या चौकशीचे आदेश दिले होते. नवटाके यांना सेवेतून बडतर्फ अथवा निलंबीत करावे यासाठी दबाव वाढला होता. सोमवारी सायंकाळी पोलिस महासंचालक कार्यालयातून नवटाके यांच्या बदलीचे आदेश आले. त्यांना तात्पुरत्याडॉ भोसलेंकडे पदभार
दरम्यान भाग्यश्री नवटाके यांच्या बदलीनंतर माजलगावच्या उपविभागीय पोलिस अधिकारी पदाचा पदभार गेवराईचे उपविभागीय पोलिस अधिकारी डॉ अर्जून भोसले यांच्याकडे देण्यात आला आहे पोलिस अधीक्षक जी श्रीधर यांनी याबाबत माहिती दिली. - स्वरुपात औरंगाबाद येथील राज्य गुप्तचर विभागात संलग्न करण्यात येत असल्याचे आदेशात म्हटले आहे.
Subscribe to:
Post Comments (Atom)
Post a Comment